अमृतसर हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात, ग्रेनेड फेकणाऱ्या स्थानिक तरुणाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2018 04:32 PM2018-11-21T16:32:34+5:302018-11-21T17:11:04+5:30
अमृतसरमधील निरंकारी भवनावर झालेल्या ग्रेनेड हल्ल्याप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
अमृतसर - अमृतसरमधील निरंकारी भवनावर झालेल्या ग्रेनेड हल्ल्याप्रकरणी एका स्थानिक तरुणाला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, चौकशीवेळी त्याने पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या मदतीने हा हल्ला घडवून आणल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी या हल्ल्यामागे आयएसआयचा हात असल्याचा माहितीस दुजोरा दिला आहे. रविवारी झालेल्या या हल्ल्यात तीन जणांचा मृत्यू झाला होता.
अमृतसरमधील ग्रेनेड हल्ल्यामागे खलिस्तानी दहशतवादी हरमीत सिंह हॅपी उर्फ पीएचडी याचा हात असल्याचे समोर आले आहे. पाकिस्तानमध्ये लपलेल्या हॅपी उर्फ पीएचडीने स्थानिक तरुणांच्या मदतीना हा ग्रेनेड हल्ला घडवून आणला होता. दरम्यान, या हल्ल्यामागे कुठलाही सांप्रदायिक अॅंगल नसल्याचे अमरिंदर सिंह यांनी स्पष्ट केले आहे.
There is no communal angle. It's pure case of terrorism.They were targeted as they were easy targets.We had info in the past about other organisations being targeted but we took precautionary measures & prevented that:Punjab CM on #Amritsar blast at Nirankari Mission congregation pic.twitter.com/p4resLrxt6
— ANI (@ANI) November 21, 2018
रविवारी अमृतसरमधील राजासांसी येथील निरंकारी भवनात सत्संग सुरू असताना दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी ग्रेनेड फेकून हल्ला केला होता. या हल्ल्यामुळे देशभरात खळबळ उडाली होती. तसेच सुरक्षा यंत्रणाही सतर्क झाल्या होत्या. अखेरीस या हल्ल्याच्या तपासादरम्यान, सुरक्षा यंत्रणांनी दोन्ही आरोपी तरुणांची ओळख पटवून त्यापैकी एकाला अटक केली. अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव बिक्रमजीत सिंह असून, तो धालीवाल गावातील रहिवासी आहे. अन्य आरोपीचे नाव अवतार सिंह असून, त्यालाही अटक करण्यात येईल, अशी माहिती पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी दिली. दहशतवादी आता काश्मीरमधून पंजाबच्या दिशेने पावले वळवत आहेत. मात्र आम्ही त्यांना रोखू, असेही अमरिंदर सिंग यांनी सांगितले.
I'm happy to announce that police nabbed one of the two persons involved. 26-year-old Bikramjit Singh has been arrested. The other man will also be arrested soon. His name is Avtar Singh: Punjab CM on #Amritsar blast at Nirankari Mission congregation that claimed 3 lives pic.twitter.com/k0S52mpdKe
— ANI (@ANI) November 21, 2018
This is the type of grenade which has been taken from other modules. This is the one being used against forces in Kashmir & this is the one that burst. This one is made under license by Pakistan ordinance* factory & is filled with pellets: Punjab CM Captain Amarinder Singh https://t.co/z7QPU1fJ0y
— ANI (@ANI) November 21, 2018