पाकिस्तानी लढाऊ विमानांची पुन्हा भारतीय हद्दीत घुसखोरी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2019 01:42 PM2019-02-28T13:42:19+5:302019-02-28T13:42:41+5:30
बुधवारी भारताच्या हद्दीत घुसून हल्ला करण्याचा अपयशी प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानी लढाऊ विमानांनी आज पुन्हा एकदा भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रय्तन केला.
श्रीनगर - बुधवारी भारताच्या हद्दीत घुसून हल्ला करण्याचा अपयशी प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानी लढाऊ विमानांनी आज पुन्हा एकदा भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रय्तन केला. जम्मू-काश्मीरमधील पुंछ परिसरात दोन पाकिस्तानी लढाऊ विमानांनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या विमानांना पिटाळून लावण्यात आले. दरम्यान, भारत आणि पाकिस्तानमधील तणावामुळे सीमावर्ती भागात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
दरम्यान, भारतीय हद्दीत बुधवारी सकाळी घुसून हल्ला करू पाहणाऱ्या पाकिस्तानी हवाई दलाच्या विमानांना भारताने चोख उत्तर देत पिटाळून लावले आणि पाकिस्तानचे एफ-१६ विमान त्यांच्याच हद्दीत पाडले होते. त्यानंतर, अन्य पाकिस्तानी विमाने निघून गेली. मात्र, पाकिस्तानचे विमान पाडताना मिग-२१ हे विमान भारताने गमावले. तसेच त्याचा वैमानिक बेपत्ता असल्याचे भारताचे परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी सांगितले. त्यानंतर, त्याच्या सुटकेची मागणी भारताने पाकिस्तानकडे केली. मात्र, सकाळच्या हल्ल्यानंतर भारताने देशातील सुरक्षा व्यवस्था अतिशय कडक केली असून, पंजाब, हिमाचल प्रदेश व जम्मू-काश्मीरमधील सर्व विमानतळे प्रवासी विमानांसाठी बंद करण्यात आली होती.