पाकचा पूंछमध्ये पुन्हा गोळीबार, १ ठार ६ जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2015 11:50 AM2015-09-07T11:50:11+5:302015-09-07T11:52:21+5:30
पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत केलेल्या गोळीबारात १ जण ठार तर ६ नागरिक जखमी झाले आहेत.
Next
ऑनलाइन लोकमत
जम्मू, दि. ७ - पाकिस्तानच्या कुरापती अद्यापही कायम असून पाकिस्तानी जवानांनी गेल्या २४ तासांत तीन वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करत पूंछ जिल्ह्यात केलेल्या गोळीबारात १ नागरिक ठार तर ६ जण जखमी झाले आहेत.
लष्कराच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या लष्कराने भारतीय चौक्या व नागरिकांना लक्ष्य करत स्वयंचलित मशिनगनच्या सहाय्याने कालपासून तीनवेला गोळीबार केला. या गोळीबारात ७ नागिरक जखमी झाले होते, त्यातील एकाचा आज मृत्यू झाला. पाकच्या गोळीबाराला भारतीय लष्करानेही सडेतोड प्रत्युत्तर दिले.