पाकिस्तानातील हिंदू भारतात करु शकतात संपत्ती खरेदी

By admin | Published: April 18, 2016 08:48 AM2016-04-18T08:48:32+5:302016-04-18T08:48:32+5:30

केंद्रीय गृहमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानातील हिंदू भारतात संपत्ती खरेदी करु शकतात

Pakistani Hindus can buy wealth that India can do | पाकिस्तानातील हिंदू भारतात करु शकतात संपत्ती खरेदी

पाकिस्तानातील हिंदू भारतात करु शकतात संपत्ती खरेदी

Next
>ऑनलाइन लोकमत - 
नवी दिल्ली, दि. १८ - पाकिस्तानमधील हिंदूंना भारतात संपत्ती खरेदी करायची असेल तर त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानातील हिंदू भारतात संपत्ती खरेदी करु शकतात. महत्वाचं म्हणजे पाकिस्तानातील हिंदूंना पॅनकार्ड आणि आधारकार्डाचीही सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
 
पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधून भारतात येऊन वास्तव्य करणा-यांची संख्या जवळपाल दोन लाखाहून अधिक आहे. यामध्ये हिंदू आणि शीख नागरिकांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. यापैकी 400 पाकिस्तानी हिंदू सध्या भारतातील जोधपूर, जैसलमेर, जयपूर, रायपूर यासारख्या शहरांमध्ये वास्तव्याला आहेत. व्हिसावर भारतात राहणाऱ्या या लोकांना अनेक सुविधा मिळत नाहीत ज्यामुळे प्रत्येक दिवशी समस्यांना सामोरे जावं लागत आहे. त्यांच्या समस्यांचा विचार करता सरकारने हा निर्णय घेतल्याची माहिती गृहमंत्रालयाने दिली आहे.
 

Web Title: Pakistani Hindus can buy wealth that India can do

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.