Seema Haider : नवा ट्विस्ट! सीमा हैदरने दिला मोठा धक्का; चित्रपटात काम करण्यास नकार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2023 10:18 AM2023-08-14T10:18:24+5:302023-08-14T10:32:02+5:30
Seema Haider : सीमा हैदर सतत चर्चेत असते. तिला चित्रपटांपासून राजकारणापर्यंतच्या ऑफर्स आल्या आहेत.
पाकिस्तानातून पळून भारतात आलेली सीमा हैदर सतत चर्चेत असते. तिला चित्रपटांपासून राजकारणापर्यंतच्या ऑफर्स आल्या आहेत. लवकरच ती निर्माता अमित जानी यांच्या चित्रपटातून पदार्पण करणार असल्याची जोरदार चर्चा रंगली होती. अमित जानी यांनी तर सीमा आणि सचिनच्या प्रेमकथेवर चित्रपट बनवण्याची घोषणा केली होती. त्यासाठी कलाकारांनाही फायनल करण्यात आले आहे. मात्र याचदरम्यान एका सीमा हैदरने त्यांना मोठा धक्का दिला आहे.
जानी फायरफॉक्सचे व्यवस्थापकीय संचालक अमित जानी यांनी सीमाला एका चित्रपटासाठी ऑफर दिली होती. गेल्या वर्षी उदयपूरमध्ये झालेल्या टेलर कन्हैयालाल हत्याकांडावर हा चित्रपट बनत आहे. या चित्रपटासाठी जानी यांनी सीमाला रॉ एजंटची भूमिका ऑफर दिली. सीमानेही याला होकार दिला होता. ती म्हणाली होती की, ती चित्रपटात नक्की काम करेल, फक्त तिला यूपी एटीएसकडून क्लीन चिट मिळायला हवी. कारण जोपर्यंत तिला क्लीन चिट मिळत नाही तोपर्यंत ती चित्रपटात काम करू शकणार नाही.
"सीमाने चित्रपटात काम करण्यास दिला नकार"
सीमाचे वकील एपी सिंह यांनी रविवारी सांगितले की, ती यापुढे अमित जानीच्या चित्रपटात काम करणार नाही. सीमाने चित्रपटात काम करण्यास नकार दिला आहे. 'हर घर तिरंगा अभियाना'अंतर्गत रविवारी पाकिस्तानी महिला सीमा हैदरने रबूपुरा येथील आपल्या घरावर तिरंगा फडकावून भारत माता की जय आणि हिंदुस्थान जिंदाबादच्या घोषणा दिल्या. यावेळी सीमाचा प्रियकर सचिन मीणा आणि सुप्रीम कोर्टाचे वकील एपी सिंहही उपस्थित होते. वकील एपी सिंह यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना खुलासा केला की सीमा हैदरने अमित जानीच्या चित्रपटात काम करण्यास नकार दिला आहे. सीमा कोणत्याही चित्रपटात काम करणार नाही असं म्हटलं आहे.
"कराची टू नोएडा"
अमित जानीही सचिन आणि सीमा यांच्या प्रेमकथेवर चित्रपट बनवणार आहेत. ज्याला 'कराची टू नोएडा' असे नाव देण्यात आले आहे. यासाठी अमित जानी यांनी त्यांच्या टीमसोबत सीमा हैदर आणि सचिनची भूमिका साकारणाऱ्या मॉडेलचे ऑडिशनही दिले. अमित जानीने एक व्हिडीओ देखील जारी केला, ज्यामध्ये त्याने सांगितले की सीमा हैदरचे आधीचा नवरा गुलाम हैदर यांच्याशी 'कराची टू नोएडा' या चित्रपटासाठी बोलायचे आहे, कारण त्यांना सीमाबद्दल अधिकाधिक माहिती गोळा करायची आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.