पाकिस्तानच्या गोळीबारात जवान शहीद, 9 वर्षांची मुलगी ठार
By Admin | Published: July 17, 2017 12:33 PM2017-07-17T12:33:29+5:302017-07-17T13:17:15+5:30
जम्मू-काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवर भारत आणि पाकिस्तानमध्ये जोरदार धुमश्चक्री सुरु असून, राजौरी सेक्टरमध्ये पाकिस्तानने भारतीय चौक्यांवर जोरदार गोळीबार केला.
ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 17 - जम्मू-काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवर भारत आणि पाकिस्तानमध्ये जोरदार धुमश्चक्री सुरु असून, राजौरी सेक्टरमध्ये पाकिस्तानने भारतीय चौक्यांवर जोरदार गोळीबार केला. या हल्ल्यात भारताचा एक जवान शहीद झाला. नायक मुद्दसर अहमद शहीद झाले असून, दुसरीकडे बालाकोटे सेक्टरमध्ये पाकिस्तानच्या गोळीबारात एक नऊ वर्षांची मुलगी ठार झाली.
दोन्ही देशांमध्ये झालेल्या डीजीएमओ स्तराच्या चर्चेमध्ये पाकिस्तानने भारतीय सैन्याच्या गोळीबारात आपले चार सैनिक ठार झाल्याचा दावा केला. त्याचवेळी भारताने पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याचे सांगितले. पाकिस्तानच्या कुठल्याही हल्ल्याला त्याच भाषेत प्रत्युत्तर दिले जाईल असे भारताने डीजीएमओ स्तरावरील चर्चेत पाकिस्तानला बजावले आहे. महत्वाचे म्हणजे पाकिस्तानच्या विनंतीवरुन दोन्ही देशांच्या डीजीएमओमध्ये चर्चा झाल्यानंतर पाकिस्तानने अशा प्रकारे शस्त्रसंधीचे उल्लंघन केले.
शनिवारी जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील मांजाकोट भागात पाकिस्तानी सैन्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. यावेळी पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारात एक जवान शहीद झाला. गोळीबारात गंभीर जखमी झालेले लान्स नायक मोहम्मद नासीर यांचा रुग्णालयाच्या वाटेवर असताना मृत्यू झाला होता.
आणखी वाचा
जम्मू-काश्मीरच्या पुंछ सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून गेल्या दोन दिवासांपासून गोळीबारी सुरू आहे. प्रत्युत्तरात भारतीय सुरक्षा रक्षकांनी केलेल्या गोळीबारामध्ये पाकिस्तानच्या चार सैनिकांचा मृत्यू झाला आहे. रविवारी नियंत्रण रेषेजवळ रेकी करत असलेल्या पाकिस्तानी सैनिकांच्या एका वाहनावर केलेल्या गोळीबारामुळे ते वाहन नदीत बुडून चार सैनिकांचा मृत्यू झाल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे.
पाकिस्तान अधिकृत काश्मीर(पीओके)मध्ये नियंत्रण रेषेजवळ रेकी करत असलेल्या एका वाहनावर भारतीय सुरक्षा रक्षकांनी गोळीबार केला. त्यामुळे ते वाहन नदीत बुडालं, त्यामध्ये 4 सैनिक होते असं पाकिस्तानी सेनेकडून सांगण्यात आलं आहे. पीओकेच्या मुजफ्फराबादपासून 73 किलोमीटर दूर नीलम नदीजवळ असलेल्या एका वाहनावर भारतीय जवानांनी गोळीबार केला . त्यामुळे चार सैनिक नदीत बुडाले असं पाकिस्तानी सेनेचे प्रवक्ता आसिफ गफूर यांनी म्हटलं. यापेकी एका सैनिकाचा मृतदेह शोधण्यात यश आलं असून इतर तिघांचा शोध सुरू असल्याचं वृत्त आहे. वृत्तसंस्था reuters ने याबाबत वृत्त दिलं आहे
#UPDATE Naik Muddasar Ahmed,belonging to J&K"s Tral,lost his life in ceasefire violations by Pakistan on Indian Army posts in Rajouri sector pic.twitter.com/d0t3SBHNzu
— ANI (@ANI_news) July 17, 2017