जम्मू-काश्मीर: 2024 मध्ये 75 दहशतवाद्यांचा खात्मा, त्यापैकी 60 टक्के पाकिस्तानी...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2024 19:47 IST2024-12-29T19:46:36+5:302024-12-29T19:47:09+5:30
Pakistani Terrorist Killed in J&K: वर्षभरात भारतीय सैन्याने दहशतवाद्यांविरोधात कारवाई तीव्र केली आहे.

जम्मू-काश्मीर: 2024 मध्ये 75 दहशतवाद्यांचा खात्मा, त्यापैकी 60 टक्के पाकिस्तानी...
Pakistani Terrorist Killed in J&K: भीकेला लागलेला पाकिस्तान सातत्याने भारताविरोधात दहशतवादी कट रहच राहतो. भारतीय सैन्यदेखील प्रत्येकवेळी पाकिस्तानचे मनसुबे हाणून पाडते. गेल्या वर्षभरात भारतीय सैन्याने जम्मू-काश्मीरमध्ये 75 दहशतवादी मारल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, यातील 60 टक्के दहशतवादी पाकिस्तानी होते.
एएनआयच्या वृत्तानुसार, भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, भारताने पाकिस्तानचे टेरर नेटवर्क पूर्णपणे उद्धवस्त केले आहे. पाकिस्तान प्रायोजित दहशतवादी गटांमध्ये स्थानिकांची भरतीही खूपच कमी झाली आहे. या वर्षी केवळ चार स्थानिक लोक या गटांमध्ये सामील झाले आहेत. लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी आणि उत्तरेकडील लष्कराचे कमांडर लेफ्टनंट जनरल एमव्ही सुचेंद्र कुमार, हे दलाच्या व्हाईट नाइट कॉर्प्सच्या देखरेखीखाली दहशतवाद्यांचा खात्मा करण्यावर भर देत आहेत.
75 दहशतवादी मारले
लष्कराच्या अधिकाऱ्याने सांगितले की, विविध चकमक आणि ऑपरेशनमध्ये सुरक्षा दलांना जम्मू प्रदेश आणि काश्मीर खोऱ्यासह राज्यातील विविध भागात सुमारे 75 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले आहे. याशिवाय नियंत्रण रेषेवर दहशतवाद्यांच्या घुसखोरीच्या प्रयत्नादरम्यान झालेल्या गोळीबारातही लष्कराने दहशतवाद्यांना पकडले आहे. जगभरात, विशेषत: भारताला दहशतवाद्यांची निर्यात करण्याचे सर्वात मोठे केंद्र म्हणून पाकिस्तानकडे पाहिले जाते.
दहशतवाद्यांच्या कारवायांना आळा घालण्यात यश
इस्लामाबादने गेल्या वर्षभरापासून जम्मू भागात दहशतवादाला चालना देण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु जम्मू प्रदेशातील राजौरी, पुंछ, डोडा, किश्तवार, कठुआ आणि रियासी जिल्ह्यांसह पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या कारवायांवर अंकुश ठेवला जात आहे. त्यासाठी अतिरिक्त सैन्य तैनात केले जात असून, चीन सीमेवर तैनातीसाठी राष्ट्रीय रायफल्सचे एकसमान सैन्य मागे घेतल्यानंतर निर्माण झालेली पोकळी भरून काढली जात आहे.