बुऱ्हाण वानीच्या मृत्यूदिनी हल्ला घडवण्याचा दहशतवाद्यांचा डाव, पुलवामामध्ये जवानांना करू शकतात लक्ष्य  

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2019 10:22 AM2019-07-06T10:22:55+5:302019-07-06T10:25:09+5:30

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून पुन्हा एकदा मोठा हल्ला घडवून आणण्यात येण्याची भीती वर्तवण्यात येत आहे.

Pakistani terrorist plan sniper attack on army personal in Pulwama | बुऱ्हाण वानीच्या मृत्यूदिनी हल्ला घडवण्याचा दहशतवाद्यांचा डाव, पुलवामामध्ये जवानांना करू शकतात लक्ष्य  

बुऱ्हाण वानीच्या मृत्यूदिनी हल्ला घडवण्याचा दहशतवाद्यांचा डाव, पुलवामामध्ये जवानांना करू शकतात लक्ष्य  

Next

श्रीनगर - जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून पुन्हा एकदा मोठा हल्ला घडवून आणण्यात येण्याची भीती वर्तवण्यात येत आहे. गुप्तहेर खात्यातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानस्थित दहशतवादीभारतीय जवानांना पुलवामा येथे लक्ष्य करण्याच्या तयारीत असून, यावेळच्या हल्ल्यासाठी आयईडी आणि स्नायपरचा वापर होण्याची शक्यता आहे. 

 गुप्तहेर खात्यातील सूत्रांच्या म्हणण्यानुसार पाकिस्तानी दहशतवादी पुन्ह एकदा पुलवामामध्ये लष्कराला लक्ष्य करू शकतात. पाकिस्तानी दहशतवादी राष्ट्रीय महामार्गावर स्नायपर गनद्वारे सुरक्षा दलांवर हल्ला करू शकतात. याशिवाय आयईडीचा स्फोट घडवून लष्कराला धोका पोहोचवण्यात येण्याचा धोका आहे. 

 सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 6 ते 8 पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या कारस्थानाचा छडा सुरक्षा दलांनी लावला आहे. दहशतवाद्यांच्या या टोळीमध्ये एका स्नायपर एक्सपर्ट्सचाही समावेश आहे. दरम्यान, काश्मीरमध्ये लपून राहण्यासाठी पाकिस्तानी दहशतवाद्यांनी आपली नावेसुद्धा बदलली आहेत. कुख्यात दहशतवादी बुऱ्हाण वाणीच्या तिसऱ्या मृत्युदिनी त्याच्या मृत्यूचा बदला घेण्याची योजना दहशतवाद्यांनी आखली आहे. त्यासाठी सुरक्षा दलांना लक्ष्य करण्याची योजना आहे.  

लष्कराने 8 जुलै 2-016 रोजी कुख्यात दहशतवादी बुऱ्हाण वाणीला ठार केले होते. दरम्यान, गोपनीय माहितीनंतर सर्व सुरक्षा यंत्रणांना दक्षतेचे आदेश देण्यात आले आहेत. यावर्षीच 14 फेब्रुवारी रोजी दहशतवाद्यांनी पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर मोठा हल्ला घडवून आणला होता. या हल्ल्यात 40 हून अधिक जवान शहीद झाले होते.  

Web Title: Pakistani terrorist plan sniper attack on army personal in Pulwama

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.