‘भारत माता की जय’ न म्हणणारे पाकिस्तानी!, भाजपा आमदाराचे उद्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 12:51 AM2018-02-27T00:51:11+5:302018-02-27T00:51:11+5:30

भारत माता की जय न म्हणणा-यांना तर राजकारणात प्रवेशच करू द्यायला नको. ज्या लोकांना ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम्’ म्हणण्यात मनात काही किंतू असेल, तर ते...

 The Pakistani who did not say 'Bharat Mata Ki Jai'! | ‘भारत माता की जय’ न म्हणणारे पाकिस्तानी!, भाजपा आमदाराचे उद्गार

‘भारत माता की जय’ न म्हणणारे पाकिस्तानी!, भाजपा आमदाराचे उद्गार

Next

बलिया (उत्तर प्रदेश) : ‘भारत माता की जय’ जे म्हणणार नाहीत ते पाकिस्तानी आहेत, असे उत्तर प्रदेशमधील भाजपाचे आमदार सुरेंद्र सिंह यांनी सोमवारी येथे म्हटले.
बैरिया मतदार संघातून निवडून आलेले सुरेंद्र सिंह यांनीच काही दिवसांपूर्वी भारत २०२४ पर्यंत हिंदू राष्ट्र बनेल, असे जाहीर केले होते. रातसाद येथील कार्यक्रमात सुरेंद्र सिंह म्हणाले की, भारत माता की जय न म्हणणा-यांना तर राजकारणात प्रवेशच करू द्यायला नको. ज्या लोकांना ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम्’ म्हणण्यात मनात काही किंतू असेल, तर ते पाकिस्तानी असून देशात राहण्याचा त्यांना हक्क नाही. जे लोक आपल्या मातृभूमीला आईचा दर्जा देत नाहीत, त्यांची देशभक्ती संशयास्पद आहे. ज्यांना ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम्’ म्हणताना अडचणी आहेत, त्यांना राजकारणात प्रवेश करण्याचीच परवानगी असू नये, असेही त्यांनी म्हटले. बल्लिया येथे १४ जानेवारी रोजी बोलताना सिंह म्हणाले होते की, एकदा भारत हिंदू राष्ट्र बनले की, जे हिंदू संस्कृतीशी एकरूप होतील, तेच मुस्लीम या देशात राहतील. फारच थोडे मुस्लीम हे देशभक्त आहेत. एकदा भारत हिंदू राष्ट्र बनले की, जे मुस्लीम आमच्या संस्कृतीशी एकरूप होतील, ते भारतात राहतील. सुरेंद्र सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अवतारी पुरुष अशा शब्दांत वर्णन केले व काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर हल्ला केला. (वृत्तसंस्था)
पोलिसांना थप्पड मारा
बेकायदा खाणकामाबद्दल बोलताना सुरेंद्र सिंह यांनी असा सल्ला दिला की, खासगी कामासाठी वाळू घेताना कुणा पोलिसांनी अडवले, तर त्यांना सरळ दोन थपडी मारा.

Web Title:  The Pakistani who did not say 'Bharat Mata Ki Jai'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :BJPभाजपा