पाकिस्तानी नागरीकांवर गोळया चालवल्या नाहीत - बीएसएफ
By admin | Published: November 2, 2016 02:14 PM2016-11-02T14:14:49+5:302016-11-02T14:14:49+5:30
आम्ही फक्त पाकिस्तानी लष्कराच्या पोस्टना लक्ष्य केले. त्यांच्या नागरीकांना मारण्याच्या उद्देशाने गोळया चालवल्या नाहीत.
Next
ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. २ - आम्ही फक्त पाकिस्तानी लष्कराच्या पोस्टना लक्ष्य केले. त्यांच्या नागरीकांना मारण्याच्या उद्देशाने गोळया चालवल्या नाहीत पण पाकिस्तान जाणीवपूर्वक भारताच्या नागरीवस्त्यांच्या भागांना लक्ष्य करत आहे असा आरोप सीमा सुरक्षा दलाचे आयजी डीके उपाध्याय यांनी केला.
जम्मूमध्ये बुधवारी दुपारी त्यांनी पत्रकारपरिषद घेतली. पाकिस्तान विनाकारण गोळीबार करत असून, आम्ही पाकिस्तानच्या प्रत्येक शस्त्रसंधी उल्लंघनाला चोख उत्तर देत आहोत. ज्या ज्या सेक्टरमधून गोळीबार झाला त्या त्या सेक्टरमध्ये आम्ही पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिले.
पाकिस्तानच्या चौदा चौक्या उद्धवस्त केल्या. निश्चित आकडे देता येणार नाहीत पण पाकिस्तानचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे असे बीएसएफच्या आयजीनी सांगितले. या गोळीबारात निष्पाप नागरीकांचे झालेले मृत्यू खरोखर खूप दु:खद आहे असे उपाध्याय यांनी सांगितले.
Indian retaliation was accurate & measured,resulted in heavy damage to their(Pakistan) posts.We never target civilians: DK Upadhyaya,BSF IG pic.twitter.com/iXmMegGLMX
— ANI (@ANI_news) November 2, 2016