पाकिस्तानला मोठा डोस पाजा, विरेंद्र सेहवागचा संताप
By admin | Published: May 2, 2017 01:39 PM2017-05-02T13:39:06+5:302017-05-02T13:42:03+5:30
विरेंद्र सेहवागने पाकिस्तानला छोटा डोस पाजून काम होत नसेल तर मोठा डोस पाजा असं आवाहनच केलं आहे
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 2 - सीमारेषेवर पाकिस्तानी सैन्यांनी भारतीय जवानांच्या मृतदेहाची विटंबना करत अमानुष कृत्य केल्याच्या घटनेने देशभर संतापाची लाट उसळली आहे. भारतीय क्रिकेटर विरेंद्र सेहवागदेखील या घटनेमुळे दुखी असून ट्विटरच्या माध्यमातून त्याने आपला संताप व्यक्त केला आहे. विरेंद्र सेहवागने पाकिस्तानला छोटा डोस पाजून काम होत नसेल तर मोठा डोस पाजा असं आवाहनच केलं आहे.
विरेंद्र सेहवागने ट्विटर लिहिलं आहे की, "दोन भारतीय सैनिकांची अमानुष हत्या झाल्याने मी दुखी आहे. जवानांचं बलिदान वाया गेलं नाही पाहिजे. जर पाकिस्तानसाठी छोटा डोस काम करत नसेल, तर मोठा डोस दिला पाहिजे".
Heartbroken by barbaric killing of2 Indian soldiers.Martyrdom of our soldiers should not go in vain.Need a bigger dose,if small doesn"t work
— Virender Sehwag (@virendersehwag) May 2, 2017
जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यातील कृष्णा घाटी सेक्टरमधील मेंढरमध्ये संघर्षविरामाचे उल्लंघन करत नियंत्रण रेषेच्या आत २५० मीटरपर्यंत घुसलेल्या पाकिस्तानी विशेष दलाच्या जवानांनी सोमवारी केलेल्या तोफगोळ्यांच्या मा-यात दोन भारतीय जवान शहीद झाले. पाकिस्तानी जवानांनी या जवानांचे शीर कापून मृतदेहाची विटंबना केल्याचे उघड झाल्याने सर्वत्र संतापाची लाट उसळली असून, या अमानुष कृत्याला चोख उत्तर देण्याचा इशारा भारताने दिला आहे. लष्कराला त्यासाठी सर्वाधिकार देण्यात आल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.
केंद्र सरकारने लष्कराला पाकिस्तानने केलेल्या अमानुष कृत्याचं उत्तर देत कारवाई करण्यासाठी पुर्णपणे सूट दिली आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री अरुण जेटली यांनी शहिद जवानांचं बलिदान वाया जाणार नाही असं सांगितलं आहे.