पाकच्या बिलावल भुट्टोची वेबसाईट भारतीयाकडून हॅक
By admin | Published: October 8, 2014 07:28 PM2014-10-08T19:28:44+5:302014-10-08T19:28:44+5:30
बिलावल भुट्टो यांच्या पाकिस्तान पीपल्स पार्टीची वेबसाईट एका भारतीय नागरिकाने हॅक करून बिलावल भुट्टोला काश्मिर प्रश्नावर चांगलेच कोंडीत पकडले आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ७ - पाकिस्तानच्या बिलावल भुट्टो यांच्या पाकिस्तान पीपल्स पार्टीची वेबसाईट एका भारतीय नागरिकाने हॅक करून बिलावल भुट्टोला काश्मिर प्रश्नावर चांगलेच कोंडीत पकडले आहे. वेबसाईट हॅक झाल्याने बिलावल भुट्टोवर चांगलीच नामुष्की ओढावली आहे.
सध्या भारतीय सीमेवर पाकिस्तानकडून सतत गोळीबार सुरू असल्याने दोन्ही देशामधील संबंध ताणले गेले आहेत. एकीकडे या दोन्ही देशाच्या सीमेवरील घटनांची चर्चा सुरू असतानाच एका भारतीय नागरीकाने बिलावल भुट्टोची पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी )ची वेबसाईट हॅक करून त्यावर संदेश पाठवला आहे. बिलावल भुट्टोने काश्मिरची एक-एक इंच जमीन आपण भारताकडून मिळवून घेवू असे वादग्रस्त ट्विट केले होते. या ट्टिटला उत्तर देताना हॅक करणा-या नागरिकाने बिलावल भुट्टोला प्रश्न विचारला आहे. कोणतीही हिंसा न करता पाकिस्तान कधीही काश्मिरची जमीन मिळवू शकणार नाही. हे सत्य आहे. आणि हे सत्य तुम्हाला स्वीकारावेच लागेल असा संदेश पाठवला आहे.