पाकचे नागरी वस्त्यांवर हल्ले सुरूच; लाख लोकांचे स्थलांतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 01:44 AM2018-05-25T01:44:23+5:302018-05-25T01:44:23+5:30
सातत्याने तोफगोळ्यांचा मारा : आतापर्यंत ११ ठार, ६0 जखमी
जम्मू : गेल्या नऊ दिवसांपासून पाकिस्तानी सैन्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करून आंतरराष्ट्रीय सीमेलगत भारतीय हद्दीतील लष्करी चौक्या व नागरी वस्त्यांवर तोफगोळ्यांचा सातत्याने चालविलेला मारा बुधवारी रात्रीनंतर थांबविला होता. सीमेवर शांतता निर्माण झाली होती. परंतु लोकांनी सुटकेचा नि:श्वास सोडताच पाकने पुन्हा रात्रीपासून राजौरी जिल्ह्याच्या लाम व नौशेरा भागात व प्रत्यक्ष नियंत्रणरेषेवर उरी क्षेत्रात गोळीबार सुरू केला. त्यात एक भारतीय रहिवासी मरण पावला.
गेल्या नऊ दिवसांत पाकने केलेल्या माऱ्यात भारतीय हद्दीतील ११ जणांचा मृत्यू झाला व ६० जण जखमी झाले होते. सीमेलगतचे अर्निया शहर व परिसरातल्या १२० गावांमधील नागरिक आपली घरेदारे सोडून एक तर नातेवाइकांकडे किंवा सरकारने कथुआ, सांबा, जम्मू जिल्ह्यांमध्ये उभारलेल्या तात्पुरत्या छावण्यांमध्ये राहायला गेले आहेत. आतापर्यंत एक लाखांवर लोकांनी स्थलांतर केले आहे. (वृत्तसंस्था)
मंत्र्यांची भेट, जखमींची केली विचारपूस
जम्मू-काश्मीरचे भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंदर राणा व त्या पक्षाचे खासदार जुगलकिशोर शर्मा यांनी तोफगोळ्यांच्या माºयात जखमी झालेल्यांची जम्मूतील रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. माºयामुळे सीमाभागात उद््भवणाºया विपरीत परिस्थितीत नागरिकांना तातडीने मदत पुरविण्यासाठी पोलीस व अन्य यंत्रणांनी सज्ज राहावे, असे आदेश राज्याचे पुनर्वसन मंत्री जावेद मुस्तफा मीर व सार्वजनिक आरोग्य मंत्री श्याम चौधरी यांनी दिले आहेत. या दोघांनी आर एस पुरा भागात गावांना भेट देऊन तेथील स्थितीची पाहणी केली. हल्ल्यात मृत पावलेल्यांच्या कुटुंबीयांचीही त्यांनी
भेट घेतली.
अर्निया शहरात सुमारे साडेअठरा हजार लोक राहतात. पण आता तेथे काही पोलिसांव्यतिरिक्त कोणीही नजरेस पडत नाही.
गुरेढोरे व लोकांच्या मालमत्तेच्या रक्षणासाठी पोलीस अहोरात्र अर्निया व आजूबाजूच्या गावांत गस्त घालत आहेत.
आंतरराष्ट्रीय सीमेलगतच्या पाच किमी भागातील २०० शिक्षणसंस्था गेले पाच दिवस
बंद आहेत. शेती
व अन्य सारी कामे ठप्प आहेत.
यंदाच्या वर्षी पाकने ८०० वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे.