पाककडून घुसखोरीत सातत्याने वाढ - जेटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2017 12:42 AM2017-08-05T00:42:01+5:302017-08-05T00:42:06+5:30

पाकिस्तानकडून सीमेवरून जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादी पाठवायचे प्रमाण वाढले असले तरी दहशतवादी जास्त प्रमाणात ठार झाले आहेत, असे संरक्षणमंत्री अरूण जेटली यांनी शुक्रवारी लोकसभेत सांगितले.

 Pakistan's continuous increase in intrusion - Jaitley | पाककडून घुसखोरीत सातत्याने वाढ - जेटली

पाककडून घुसखोरीत सातत्याने वाढ - जेटली

Next

नवी दिल्ली : पाकिस्तानकडून सीमेवरून जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादी पाठवायचे प्रमाण वाढले असले तरी दहशतवादी जास्त प्रमाणात ठार झाले आहेत, असे संरक्षणमंत्री अरूण जेटली यांनी शुक्रवारी लोकसभेत सांगितले.
जेटली म्हणाले की, भारतीय लष्कराचे पश्चिम सीमेवर वर्चस्व आणि प्रभाव आहे आणि सीमेपलीकडून पाकिस्तानची घुसखोरी रोखण्यासाठी सर्व ती पावले उचलली गेली आहेत. पाकिस्तानने घुसखोरीचे प्रयत्न वाढवले आहेत. मात्र
सुरक्षा दलांच्या अतिशय सावधगिरीमुळे घुसखोरीचे अनेक प्रयत्न निष्फळ ठरवण्यात आले असून घुसखोरी घटली आहे.
विक्रमी संख्येने घुसखोर ठार मारले गेले आहेत. यावर्षी सीमेपलीकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन होण्याच्या २८५ घटना घडल्या.
२०१६ मध्ये हीच संख्या २२९ होती
व त्यात ८ लोकांना प्राण गमवावे लागले होते, असे जेटली
म्हणाले. अरूण जेटली म्हणाले की,‘‘शस्त्रसंधी उल्लंघनाच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर २२१ घटना घडल्या. या सीमेचे संरक्षण सीमा सुरक्षा दल आणि लष्कराकडे आहे.

Web Title:  Pakistan's continuous increase in intrusion - Jaitley

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.