पाकिस्तानच्या कुरापती सुरूच, पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2016 08:33 AM2016-10-01T08:33:53+5:302016-10-01T08:41:39+5:30
पाकिस्तानच्या कुरापती अजूनही सुरूच आहेत. सीमारेषेवर पाकिस्तानने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. जम्मू काश्मीरमधील अखनूर परिसरात पहाटे चारच्या सुमारास पाकिस्तानी सैन्याने गोळीबार सुरू केला.
Next
ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि.1- पाकिस्तानच्या कुरापती अजूनही सुरूच आहेत. सीमारेषेवर पाकिस्तानने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. जम्मू काश्मीरमधील अखनूर परिसरात पहाटे चारच्या सुमारास पाकिस्तानी सैन्याने गोळीबार सुरू केला. गेल्या 56 तासांमध्ये पाचपेक्षा अधिक वेळा पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे.
आणखी बातम्या
चंदू चव्हाणच्या सुटकेसाठी प्रयत्न
आत्मघाती हल्ल्याचा देशभरात हाय अॅलर्ट
भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तानच्या कुरापती आणखी वाढल्या आहेत. सीमेवर पाकिस्तानी सैन्याच्या हालचाली देखील वाढल्या असून काही भागांमध्ये पाकिस्तानी रेंजर्स दिसल्याचे कळत आहे.
#FLASH Ceasefire violation by Pakistan in Pallanwala sector of Akhnoor (J&K) started around 4 am, firing still going on.
— ANI (@ANI_news) October 1, 2016