पुन्हा मोदींचीच सत्ता येण्याचा संकेतांमुळे पाकिस्तानात अस्वस्थता

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2019 10:43 AM2019-05-22T10:43:01+5:302019-05-22T10:44:43+5:30

गुरुवारी जाहीर होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. केवळ देशाचीच नव्हे तर शेजारच्या पाकिस्तानचीही नजर या निकालांकडे आहे.

Pakistan's discomfort due to the signal of coming back to Modi Government | पुन्हा मोदींचीच सत्ता येण्याचा संकेतांमुळे पाकिस्तानात अस्वस्थता

पुन्हा मोदींचीच सत्ता येण्याचा संकेतांमुळे पाकिस्तानात अस्वस्थता

googlenewsNext

नवी दिल्ली - गुरुवारी जाहीर होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. केवळ देशाचीच नव्हे तर शेजारच्या पाकिस्तानचीही नजर या निकालांकडे आहे. दोन्ही देशांच्या सीमेवर असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतात सत्तांतर होणार की मोदींची सत्ता कायम राहणार याची उत्सुकात पाकिस्तानी नागरिक आणि उच्चपदस्थामध्ये आहे. त्यातही भारतात पुन्हा मोदींची सत्ता येऊ नये, असे अनेक पाकिस्तानी नागरिकांना वाटते. काही महिन्यांपूर्वी भारतीय हवाई दलाने पाकिस्तानी हद्दीत घुसून केलेली एअरस्ट्राइक हे त्यामागचे कारण असल्याचे बोलले जात आहे. 

 पाकिस्तानी नागरिक नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारच्या पुन्हा सत्तेत येण्याबाबतचे मत तेथील वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून व्यक्त करत आहेत. तसेच अनेक पाकिस्तानी नागरिकांकडून सोशल मीडियावरही  भारतातील निवडणुकांसंदर्भातील पोस्ट शेअर केल्या जात आहेत. यासंदर्भातील वृत्त हिंदी संकेतस्थळ नवभारत टाइम्सने प्रसारित केले आहे. 


मोदींनी पाकिस्तानमध्ये एअर स्ट्राइक केली होती. त्यामुळे ते पुन्हा सत्तेत येता कामा नये, असे लाहोर येथे राहणाऱ्या शाही आलम यांनी वृत्तवाहिनीला सांगितले. तर  मोदी पुन्हा बहुमताने सत्तेवर येतील याबाबत माझ्या मनात शंका आहे. त्यांना बहुमत मिळणार नाही, ही बाब पाकिस्तानच्या दृष्टीने चांगली असेल, असे अन्य एका व्यक्तीने सांगितले. दरम्यान, मोदी पुन्हा पंतप्रधान बनल्यास दोन्ही देशांमधील शांतता चर्चेची शक्यता वाढेल, अशी आशा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी काही महिन्यांपूर्वी व्यक्त केली होती.  

मात्र पाकिस्तानमध्ये राहणाऱ्यांपेक्षा देशाबाहेर राहणाऱ्या पाकिस्तानी व्यक्तींची मोदींबाबतची भूमिका वेगळी आहे. लंडन येथे राहणारे पाकिस्तानी उद्योगपती रियाझ सांगतात की, ''मोदी पुन्हा सत्तेत आले पाहिजेत. त्यामुळे पाकिस्तानी भूमीवरून चालणाऱ्या दहशतवादी संघटनांना आळा बसू शकेल. तसेच पाकिस्तानी सरकारवर दहशतवाद संपुष्टात आणण्यासाठी मोदी दबाव आणू शकतात.''   

Web Title: Pakistan's discomfort due to the signal of coming back to Modi Government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.