ट्रम्प पुढे नाही चालणार पाकिस्तानची डबलढोलकी
By admin | Published: January 3, 2017 01:50 PM2017-01-03T13:50:21+5:302017-01-03T14:00:03+5:30
रिपब्लिकन हिंदू गटाचे संस्थापक आणि भारतीय अमेरिकन उद्योगपती शलभ कुमार यांच्या बरोबर झालेल्या बैठकीत ट्रम्प यांनी...
Next
ऑनलाइन लोकमत
न्यूयॉर्क, दि. 3 - अमेरिकेचे नवनिर्वाचीत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यापुढे पाकिस्तानची दुटप्पी भूमिका अजिबात सहन करणार नसल्याचे रिपब्लिकन पक्षाच्या हिंदू गटाकडे स्पष्ट केले आहे.
रिपब्लिकन हिंदू गटाचे संस्थापक आणि भारतीय अमेरिकन उद्योगपती शलभ कुमार यांच्या बरोबर झालेल्या बैठकीत ट्रम्प यांनी यापुढे पाकिस्तानची दुटप्पी भूमिका चालणार नसल्याचे सांगितले.
शलभ कुमार यांचे भाजपा आणि आरएसएसमधील नेत्यांशी चांगले संबंध असल्याचे बोलले जाते. राष्ट्राध्यक्षीय निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात शलभ कुमार यांनी ट्रम्प यांच्यासाठी न्यूजर्सीमध्ये प्रचारसभा आयोजित केली होती तसेच त्यांच्या प्रचारमोहिमेला 6 कोटी रुपयांची देणगीही दिली होती. शलभ कुमार यांनी भारत-अमेरिकेमध्ये असलेला 100 अब्ज डॉलरचा व्यापार 300 अब्ज डॉलरपर्यंत वाढण्याचेही लक्ष्य ठेवले आहे.