पर्यायी सार्क स्थापण्याचा पाकचा प्रयत्न
By admin | Published: October 13, 2016 04:53 AM2016-10-13T04:53:17+5:302016-10-13T04:53:17+5:30
चीन, इराण आणि मध्य अशियायी देशांना एकत्र करून फार मोठी दक्षिण अशियायी आर्थिक आघाडी स्थापन करण्याच्या आणि त्याद्वारे भारताला शह देण्याचा प्रयत्न
इस्लामाबाद : चीन, इराण आणि मध्य अशियायी देशांना एकत्र करून फार मोठी दक्षिण अशियायी आर्थिक आघाडी स्थापन करण्याच्या आणि त्याद्वारे भारताला शह देण्याचा प्रयत्न पाकिस्तान करीत आहे. आहे. सार्क परिषदेवर असलेल्या भारताच्या प्रभावाला अंकुश लावण्यासाठी हा त्याचा प्रयत्न आहे, असे वृत्त बुधवारी ‘डॉन न्यूज’ ने दिले.
राजकीय निरीक्षकांचा हवाला देऊन या वृत्तात म्हटले आहे की, आठ सदस्यांच्या साऊथ अशियन असोसिएशन फॉर रिजनल
को-आॅपरेशनवर (सार्क) भारताच्या असलेल्या नियंत्रण पकडीला शह देण्यासाठी पाकिस्तान नवी आघाडी स्थापन करण्याच्या प्रयत्नांत आहे. पाकिस्तानचे संसदीय शिष्टमंडळ गेल्या पाच दिवसांपासून वॉशिंग्टनच्या भेटीवर असून त्याने या नव्या आघाडीची कल्पना मांडली आहे, असे वृत्तात म्हटले. मोठी दक्षिण अशिया सध्याच आकार घेत आहे, असे सिनेटर मुशाहीद हुसेन सईद यांनी म्हटल्याचे ‘डॉन न्यूज’ने म्हटले. या मोठ्या आघाडीमध्ये चीन, इराण आणि शेजारच्या मध्य अशियायी प्रजासत्ताक देशांचा समावेश आहे.