पाकिस्तानी लढाऊ विमाने भारतात घुसल्याचा दावा खोटा - एअरफोर्स

By Admin | Published: May 24, 2017 01:45 PM2017-05-24T13:45:15+5:302017-05-24T14:01:23+5:30

सियाचीन ग्लेशिअर भागातून पाकिस्तानी हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी उड्डाण केल्याचा पाकिस्तानी माध्यमांचा दावा भारतीय हवाई दलाने फेटाळून लावला आहे.

Pakistan's fighter aircraft claim to have entered India - Air Force | पाकिस्तानी लढाऊ विमाने भारतात घुसल्याचा दावा खोटा - एअरफोर्स

पाकिस्तानी लढाऊ विमाने भारतात घुसल्याचा दावा खोटा - एअरफोर्स

googlenewsNext

 ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. 24 - सियाचीन ग्लेशिअर भागातून पाकिस्तानी हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी उड्डाण केल्याचा पाकिस्तानी माध्यमांचा दावा भारतीय हवाई दलाने फेटाळून लावला आहे. हवाई हद्दीचे कुठलेही उल्लंघन झाले नसल्याचे भारतीय हवाई दलाने म्हटले आहे. पाकिस्तानच्या हवाई दलाचे प्रमुख मार्शल सोहेल अमन यांनी स्कार्डू भागातील कादरी एअरबेसला भेट दिली. 
 
यावेळी सोहेल अमन यांनी "मिराज"  हे लढाऊ विमान स्वत: चालवताना  सियाचीन-ग्लेशिअर भागातून नेले असे पाकिस्तानी माध्यमांनी म्हटले होते. जर असे घडले असेल तर ते हवाई हद्दीच्या नियमांचे उल्लंघन आहे. भारतीय वायू दलाने लगेचच पाकिस्तानचा दावा फेटाळून लावला आहे. 
 
भारतीय सैन्यदलाने मंगळवारी सीमारेषेवरील पाकिस्तानी चौक्या नष्ट केल्याचा व्हिडीओ सार्वजनिक केल्यानंतर पाकिस्तानात अस्वस्थतता निर्माण झाली आहे. जळफळाट झाल्याने पाकिस्तानने अशी कुठली कृती केल्याची शक्यता नाकारता येणार नाही. सध्या स्कार्डू येथील तळावर पाकिस्तानच्या लढाऊ विमानांचा युद्ध सराव सुरु आहे. भारताचा संभाव्य धोका लक्षात घेऊन पाकिस्तानने हा हवाई तळ कार्यात्निवत करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताने आक्रमकता दाखवली तर आमचे उत्तर भारताच्या पुढच्या पिढयांना लक्षात राहील असे असेल अशी धमकीची भाषा सोहेल अमन यांनी वापरली आहे. 
 

Web Title: Pakistan's fighter aircraft claim to have entered India - Air Force

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.