पाकिस्तान तोंडावर आपटलं; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्रात काश्मीरचा उल्लेखच नाही!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2018 01:56 PM2018-08-20T13:56:27+5:302018-08-20T14:09:11+5:30

काश्मीरच्या प्रश्नावरून पाकिस्तान पुन्हा एकदा तोंडघशी पडलं आहे.

pakistans foreign minister said on pm modis letter to imran there was no new proposal for dialogue | पाकिस्तान तोंडावर आपटलं; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्रात काश्मीरचा उल्लेखच नाही!

पाकिस्तान तोंडावर आपटलं; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्रात काश्मीरचा उल्लेखच नाही!

googlenewsNext

नवी दिल्ली- काश्मीरच्या मुद्द्यावरून पाकिस्तान पुन्हा एकदा तोंडघशी पडलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीइम्रान खान पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर त्यांनी अभिनंदन करणारं पत्र लिहिलं होतं. त्यानंतर पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन नरेंद्र मोदींनी काश्मीर प्रश्नावर चर्चा करण्याचं निमंत्रण दिल्याचं सांगितलं होतं. परंतु त्यांचा हा दावा पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानंच फेटाळून लावला आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. पत्रातून मोदींनी इम्रान खान यांचं अभिनंदन केलं, तसेच दोन देशांनी भविष्याच्या दृष्टिकोनातून वाटचाल करावी, असं पत्रात नमूद असल्याचं पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे.



इम्रान खान यांनी निवडणूक जिंकल्यानंतर भारताबरोबर सकारात्मक संबंध ठेवण्याच्या दृष्टीनं पावलं उचलली होती. पंतप्रधान इम्रान खान यांनी शेजारील देशांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवण्याचाही भाषणात उल्लेख केला होता. शेजारील देशांशी चांगले संबंध ठेवल्यास पाकिस्तानात शांती नांदण्यास मदत होणार असल्याचंही इम्रान खान म्हणाले होते. इम्रान खान यांनी गेल्या शनिवारी पाकिस्तानच्या 22 व्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. काळ्या रंगाची शेरवानी परिधान केलेल्या इम्रान यांनी उर्दूतून शपथ घेतली. काँग्रेस नेते व माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंह सिद्धू यांच्यासह अनेक माजी आणि विद्यमान क्रिकेटपटू या सोहळ्याला उपस्थित होते.

जुलैमध्ये झालेल्या निवडणुकीत इम्रान खान यांचा पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या. मात्र, पक्षाकडे बहुमत नव्हते. शुक्रवारी सहयोगी पक्षांच्या मदतीने या पक्षाने आपले मताधिक्य संसदेत दाखवले. यावेळी इम्रान खान यांना 176 मते मिळाली तर पाकिस्तान मुस्लीम लीगचे उमेदवार शाहबाज शरीफ यांना 96 मते मिळाली.

Web Title: pakistans foreign minister said on pm modis letter to imran there was no new proposal for dialogue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.