कानपूर रेल्वे अपघातामागे पाकिस्तानचा हात?
By admin | Published: January 17, 2017 08:09 PM2017-01-17T20:09:20+5:302017-01-17T20:33:19+5:30
कानपूरमध्ये झालेल्या रेल्वे अपघातामागे पाकिस्तानची आयएसआय ही संघटना असल्याचा संशय बिहार पोलिसांनी व्यक्त केला आहे.
ऑनलाइन लोकमत
कानपूर, दि. 17 - कानपूरमध्ये झालेल्या रेल्वे अपघातामागे पाकिस्तानची आयएसआय ही संघटना असल्याचा संशय बिहार पोलिसांनी व्यक्त केला आहे.
नेपाळमध्ये तसेच भारतामध्ये एकूण सहा जणांना बिहार पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या चौकशीत आयएसआयने बॉम्ब पेरण्यासाठी पैसे दिल्याचे सांगण्यात येत आहे. टाइम्स नाऊच्या वृत्तानुसार, 140 प्रवाशांनी प्राण गमवेला हा अपघात पाकिस्ताने घडवून आणल्याची दाट शक्यता आहे, या अंगाने पुढील तपास पोलिस करत आहेत.
दरम्यान, कानपूरमध्ये 20 नोव्हेंबरला पाटणा-इंदूर एक्स्प्रेसचे 14 डबे रुळावरुन घसरुन भीषण अपघात झाला होता. हा अपघात कानपूरमधील पुखरायान रेल्वे स्टेशनजवळ पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास झाला होता. या अपघातात आत्तापर्यंत 140 जणांचा मृत्यू झाल्याचे समजते, तर अनेक जण जखमी झाले आहेत. रेल्वे पटरी उखडल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली होती. मात्र, आता या अपघाताला वेगळे वळण लागले असून पाकिस्तानचा हात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
Arrested persons were given more targets, probe underway to find their links with Kanpur train accident: SP Jitendra Rana pic.twitter.com/KeP5Ibco1u
— ANI (@ANI_news) 17 January 2017