पाकिस्तानचे हेलिकॉप्टर भारताच्या हद्दीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 06:18 AM2018-02-22T06:18:52+5:302018-02-22T06:19:00+5:30
करारानुसार लढाऊ विमानाने एकमेकांच्या हवाई हद्दीच्या १0 किलोमीटर अंतराहून अधिक जवळ येणार नाहीत आणि रोटरी विंग हेलिकॉप्टर्सनी हे अंतर १ किलोमीटरपेक्षा अधिक असायला हवे.
नवी दिल्ली : पाकिस्तानचे लष्करी हेलिकॉप्टर नियंत्रण रेषा व हवाई हद्द ओलांडून, बुधवारी काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यातील गुलपूर सेक्टरमध्ये दिसल्याची माहिती भारतीय लष्कराने दिली. दोन देशांमधील कराराचे हे स्पष्ट उल्लंघन आहे. लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानची एमआय १७ जातीची ३ हेलिकॉप्टर्स आकाशात उडत असताना, त्यापैकी १ प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून ३00 मीटर आत आले होते. बुधवारी सकाळी ९ वाजून ५0 मिनिटांनी ते पाहायला मिळाले. हे १९९१ मध्ये दोन्ही देशांत झालेल्या कराराचे उल्लंघन आहे.
करारानुसार लढाऊ विमानाने एकमेकांच्या हवाई हद्दीच्या १0 किलोमीटर अंतराहून अधिक जवळ येणार नाहीत आणि रोटरी विंग हेलिकॉप्टर्सनी हे अंतर १ किलोमीटरपेक्षा अधिक असायला हवे.