भारतीय चौक्यांवर पाकिस्तानचा भ्याड हल्ला
By admin | Published: October 27, 2016 10:48 PM2016-10-27T22:48:49+5:302016-10-28T00:21:36+5:30
पाकिस्तानकडून गुरूवारी संध्याकाळपासून नियंत्रण रेषेजवळ जोरदार गोळीबार सुरू आहे. पाकिस्तानी रेंजर्सकडून भारतीय लष्कराच्या चौक्यांना लक्ष्य करण्यात आलं असून यामध्ये भारताचे 5 जवान जखमी
Next
ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 27 - पाकिस्तानकडून गुरूवारी संध्याकाळपासून नियंत्रण रेषेजवळ जोरदार गोळीबार सुरू आहे. पाकिस्तानी रेंजर्सकडून भारतीय लष्कराच्या चौक्यांना लक्ष्य करण्यात आलं असून यामध्ये भारताचे 5 जवान जखमी झाल्याचं वृत्त आहे. भारतीय लष्कर पाकिस्तानच्या या नापाक हल्ल्याला सडेतोड प्रत्युत्तर देत आहे. तर, जोरदार गोळीबारामुळे सीमेवरील गावक-यांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं आहे. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी सीमा सुरक्षा दलाच्या महासंचालकांना फोन करून पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत.
पाकिस्तानी सेनेचे जवान नियंत्रण रेषेच्या अगदी जवळ दबा धरून बसले असून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात गोळीबार सुरू आहे. तसेच ग्रेनेड अटॅक आणि मोर्टारने देखील मोठ्याप्रमाणात हल्ला केला जात असल्याचं वृत्त आहे. हिरानगर, कठुआ, सांबा, अरनिया, तंगधार, अखनूर आणि मेंढर या ठिकाणांवर पाकिस्तानकडून जोरदार गोळीबार सुरू असल्याचं प्राथमिक वृत्त आहे. तर, तंगधारमध्ये भारतीय लष्कराच्या चौकीवर केलेल्या हल्ल्यात एक भारतीय जवान शहीद झाला आहे.
दुसरीकडे, भारताने दिलेल्या प्रत्युत्तरात पाकिस्तानच्या सीमेवरील गावांना मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून अनेक गावांमध्ये आग लागल्याचं वृत्त आहे.