पाकिस्तानचे तपास पथक पठाणकोट हवाईतळावर
By admin | Published: March 30, 2016 02:31 AM2016-03-30T02:31:25+5:302016-03-30T02:31:25+5:30
आयएसआयच्या एका अधिकाऱ्यासह पाकिस्तानच्या पाच सदस्यीय संयुक्त तपास पथकाने (जेआयटी)मंगळवारी येथील भारतीय वायुसेनेच्या हवाई तळाचा दौरा केला. गेल्या २ जानेवारीला
पठाणकोट : आयएसआयच्या एका अधिकाऱ्यासह पाकिस्तानच्या पाच सदस्यीय संयुक्त तपास पथकाने (जेआयटी)मंगळवारी येथील भारतीय वायुसेनेच्या हवाई तळाचा दौरा केला. गेल्या २ जानेवारीला दहशतवादी ज्या मार्गाने आत घुसले होते तेथूनच हे पथक तळात शिरले. दुसरीकडे काँग्रेस आणि आम आदमी पार्टीने (आप) या दौऱ्याला तीव्र विरोध केला आहे.
पाकिस्तानच्या संयुक्त तपास पथकासोबत भारताच्या राष्ट्रीय तपास संस्थेचे (एनआयए) अधिकारीही होते. पथकाला अपर दोअबा तलावाजवळ रोखण्यात आले. तेथून या पथकाने एका मिनी बसमधून पुढील प्रवास केला. पाकिस्तानी तपास चमूला केवळ चकमक स्थळापर्यंतच नेण्यात आले होते आणि वायुसेनेच्या दोन कर्मचाऱ्यांनी या संपूर्ण प्रक्रियेचे चित्रीकरण केले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. (वृत्तसंस्था)