पाकिस्तानची क्षेपणास्त्र चाचणी बनावट, तज्ज्ञांचा दावा
By admin | Published: January 10, 2017 05:58 PM2017-01-10T17:58:14+5:302017-01-10T17:58:14+5:30
पाकिस्तानने पाणबुडीतून मारा करणा-या बाबर-3 या क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केल्याचं वृत्त चुकीचं असल्याचं भारतीय तज्ज्ञांनी म्हटलं आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 10 - पाकिस्तानने पाणबुडीतून मारा करणा-या बाबर-3 या क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केल्याचं वृत्त चुकीचं असल्याचं भारतीय तज्ज्ञांनी म्हटलं आहे. संरक्षण आणि उपग्रह विश्लेषकांच्या मते बाबर-3 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केल्याची माहिती खोटी आहे, असं टाइम्स नाऊ या वृत्तवाहिनीनंही सांगितलं आहे.
संरक्षण विश्लेषक राज यांच्या मते, टाइम्स नाऊ या वृत्तवाहिनीनं तांत्रिक पुरावे देऊन पाकिस्ताननं बाबर-3 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केल्याच्या चुकीच्या वृत्ताचा भांडाफोड केला आहे. पाकिस्तान क्षेपणास्त्राचा दाखवलेला व्हिडीओ हा खोटा आणि कॉम्प्युटर ग्राफिक्सच्या माध्यमातून बनवण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
(पाकने पाणबुडीतून मारा करणा-या बाबर-3 ची केली यशस्वी चाचणी)
तसेच मुंबईस्थित एका तज्ज्ञानंही पाकिस्तानने कॉम्प्युटरवर बनवलेलं बाबर-3 क्षेपणास्त्राचं चित्र सोशल मीडियावर व्हायरल केल्याचं म्हटलं आहे.
#Pakistan#Nuclear#SLCM#Babur3 Notice video closely at 7s. Missile was flying with canister for almost 8 secs? Cavitation canister?? pic.twitter.com/zIwIZzmfr1
— RAJ (@rajfortyseven) 9 January 2017