पाकची पोलखोल, सर्जिकल स्ट्राइक झाल्याचं PoK च्या पोलिसानेच केला खुलासा

By admin | Published: October 5, 2016 09:22 PM2016-10-05T21:22:57+5:302016-10-05T22:03:17+5:30

नेटवर्क 18 च्या स्टिंग ऑपरेशननं पाकिस्तानची पोलखोल केली

Pakistan's policeman, revealed to have been made a surgical strike, by the police of the PoK | पाकची पोलखोल, सर्जिकल स्ट्राइक झाल्याचं PoK च्या पोलिसानेच केला खुलासा

पाकची पोलखोल, सर्जिकल स्ट्राइक झाल्याचं PoK च्या पोलिसानेच केला खुलासा

Next

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 5 - भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये लक्षवेधी कारवाई करून दहशतवाद्यांचे ७ प्रशिक्षण तळ उद्ध्वस्त करून जवळजवळ ५० दहशतवाद्यांचा खात्मा केला. मात्र पाकिस्ताननं भारताकडून कुठलेही सर्जिकल स्टाइक झालं नसल्याचा कांगावा सुरु केला आहे. यावर सीएनएन न्यूज 18 च्या स्टिंग ऑपरेशननं पाकिस्तानची पोलखोल केली आहे.

पाकिस्तान आतापर्यंत सर्जिकल स्ट्राइकबाबत किती खोटं बोलतं आहे, हे त्यांच्या एका स्थानिक पोलीस अधीक्षक गुलाम अकबर यांनी उघड केलं आहे. सीएनएन न्यूज 18च्या एका प्रतिनिधीनं पाकव्याप्त मीरपूरमधल्या लीपा या चेकपोस्टवर कार्यरत असलेल्या पोलिसाला फोनवर आयजी असल्याचे सांगून यासंबंधी सर्व माहिती जाणून घेतली आणि पाकिस्तानचा पर्दाफाश केला आहे.

फोनवरील पोलीस आणि प्रतिनिधीचं संभाषण पुढीलप्रमाणे...

रिपोर्टर- कसा आहेस, मी आयजी मुस्ताक बोलतो आहे.
गुलाम- सर देवाच्या कृपेनं मी ठीक आहे.
रिपोर्टर- तिकडे काय सुरू आहे, खूप गरमी असेल ना?
गुलाम- हो सर, मात्र सीमेवर काही चांगलं घडत नाही आहे.
रिपोर्टर- तू सर्जिकल स्ट्राइकबाबत बोलत आहेस का?
गुलाम- हो सर, सर्जिकल स्ट्राइकमध्ये आपले तीन सैनिक मारले गेले.
रिपोर्टर- मात्र दुसरीकडे 30 ते 40 जण मारले गेल्याचा दावा केला जातोय?
गुलाम- हो, ते(भारत) जास्त मारले गेल्याचा दावा करत आहेत. मात्र त्या रात्री भारतीय लष्कर सीमा पार करून पाकमध्ये आलं होतं, हे खरं आहे.
रिपोर्टर- त्यात किती मारले गेले हे तू सांगू शकतोस का ?
गुलाम- हो सर, सर्जिकल स्ट्राइकमध्ये जवळपास 12 जणांचा मृत्यू झाला आहे.
रिपोर्टर- एकाच कॅम्पमधले 12 जण मारले गेलेत का ?
गुलाम- नाही सर, माझ्याकडे याबाबत थोडीशीच माहिती आहे. मात्र भारतीय लष्करानं त्यांना घेरलं होतं.
रिपोर्टर- सर्जिकल स्ट्राइकमध्ये कोणत्या तळांना लक्ष्य करण्यात आलं?
गुलाम- भिंबरमधल्या लीपा आणि आस्मानीमधल्या तळांवर हल्ला करण्यात आला.
रिपोर्टर- मग फक्त 12 मारले गेले काय ?
गुलाम- हो सर, 12 जण शहीद झाले.
रिपोर्टर- त्यांना कुठे दफन केलं ?
गुलाम- मृतदेह शवपेटीत टाकून त्यांचे गाववाले घेऊन गेले
रिपोर्टर- त्यांच्या नावांची तुझ्याकडे यादी आहे का ?
गुलाम- हो सर
रिपोर्टर- मग मला माहिती दे
गुलाम- यादीत 5 पाकिस्तान सैनिकांचा मृत्यू झाला आहे. तर 9 जण जखमी आहेत.
रिपोर्टर- किती वेळ कारवाई सुरू होती
गुलाम- सर त्या रात्री जवळपास तीन ते चार तास म्हणजे पहाटे 2 वाजता, 4 वाजता आणि 5 वाजता सतत हल्ले सुरू होते.
रिपोर्टर- त्या ठिकाणी किती जण होते ?
गुलाम- त्याबाबत अजून माहिती समजू शकली नाही
रिपोर्टर- मात्र तू बोललास की 12 जणांचा मृत्यू झाला. 
गुलाम- सर ते एका ठिकाणावरचे नाही, तर वेगवेगळ्या ठिकाणी ठार केले.
रिपोर्टर- त्यात स्थानिक रहिवासी मारले गेले की जिहादी ?
गुलाम- सर स्थानिक नाही, जिहादी मारले गेले.
रिपोर्टर- त्यात किती जिहादी मारले गेले ?
गुलाम- त्याबाबत अजून माहिती उपलब्ध होऊ शकली नाही
रिपोर्टर- आर्मी जिहादींची माहिती लपवते आहे का ?
गुलाम - हो सर, आर्मी जिहादींची माहिती उघड करत नाही.
रिपोर्टर- मग चार ते पाच ठिकाणी केलेल्या कारवाईत 20 मृत्युमुखी पडले, असं म्हणू शकतो का ?
गुलाम- हो, किती मारले गेले हे सांगणं तसं कठीण आहे, पण ती संख्या 20च्या घरात असू शकते,
रिपोर्टर- तू तुझा परिचय देऊ शकतो का ?
गुलाम- हो सर, मी स्पेशल ब्राँचचा अधिकारी आहे.
रिपोर्टर- तुझं पूर्ण नाव काय ?
गुलाम- गुलाम अकबर.
रिपोर्टर- तुझं पद कोणतं ?
गुलाम- एसपी, स्पेशल ब्राँच.

Web Title: Pakistan's policeman, revealed to have been made a surgical strike, by the police of the PoK

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.