पाकिस्तानच्या रमझानचीही होणार घरवापसी

By admin | Published: October 29, 2015 10:11 PM2015-10-29T22:11:02+5:302015-10-29T22:11:02+5:30

तब्बल १५ वर्षे पाकिस्तानात राहिल्यावर मायदेशी परतणाऱ्या गीतानंतर आता गेल्या दोन वर्षांपासून मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये वास्तव्याला असलेल्या रमझान नामक १५ वर्षीय पाकिस्तानी

Pakistan's Ramzan will also have a homecoming | पाकिस्तानच्या रमझानचीही होणार घरवापसी

पाकिस्तानच्या रमझानचीही होणार घरवापसी

Next

भोपाळ : तब्बल १५ वर्षे पाकिस्तानात राहिल्यावर मायदेशी परतणाऱ्या गीतानंतर आता गेल्या दोन वर्षांपासून मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये वास्तव्याला असलेल्या रमझान नामक १५ वर्षीय पाकिस्तानी मुलाच्या घरवापसीच्या प्रयत्नांना वेग आला आहे.
मध्य प्रदेशच्या महिला आणि बालकल्याण मंत्री माया सिंग यांनी रमझानला त्याच्या देशात परत पाठविण्यासंदर्भात परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांच्यासोबत चर्चेचे आश्वासन दिले आहे. पाकिस्तानच्या कराची येथील रहिवासी असलेला रमझान आॅक्टोबर २०१३ मध्ये बांगलादेशातून पळून आला होता. रमझानला त्याचे वडील कराचीतून बांगलादेशात घेऊन गेले होते.
अनावधानाने तो भारतात शिरला. भोपाळ रेल्वेस्थानकावर रमझानला पोलिसांनी चाईल्ड लाईनच्या सुपूर्द केले. तेथून त्याला आरंभ-उम्मीद नामक बालगृहात पाठविण्यात आले. संस्थेने त्याला शाळेतही घातले. मात्र आपल्या आईच्या विरहाने व्याकुळ झालेल्या रमझानने गेल्या काही दिवसांपासून शाळेत जाणेही बंद केले आहे.(वृत्तसंस्था)

Web Title: Pakistan's Ramzan will also have a homecoming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.