पाकची आगळीक थांबेना
By admin | Published: August 19, 2015 10:58 PM2015-08-19T22:58:06+5:302015-08-19T22:58:06+5:30
पाकिस्तानी सैनिकांनी मंगळवारी रात्री पूंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळील वसाहती व लष्करी चौक्यांवर गोळीबार केला. पाकच्या या आगळिकीला भारतीय सैनिकांनी चोख प्रत्युत्तर दिले.
जम्मू : पाकिस्तानी सैनिकांनी मंगळवारी रात्री पूंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळील वसाहती व लष्करी चौक्यांवर गोळीबार केला. पाकच्या या आगळिकीला भारतीय सैनिकांनी चोख प्रत्युत्तर दिले.
आॅगस्ट महिन्यामध्ये शस्त्रसंधीचे ४७ वेळा उल्लंघन झाले आहे. यावर्षी भारत-पाक सीमेवर आतापर्यंत २४० हून अधिक वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले गेले. पाकिस्तानी सैनिकांनी रात्री नियंत्रण रेषेजवळ बालाकोट व पूंछ सेक्टरमधील सीमावर्ती चौक्यांवर गोळीबार केला. बालाकोट सेक्टरमध्ये रात्री १० वाजता व पूंछ सेक्टरमध्ये रात्री ११.३० वाजता पाकचा गोळीबार बंद झाला, असे लष्कराच्या एका प्रवक्त्याने सांगितले. आम्ही योग्य आणि परिणामकारक पद्धतीने प्रत्युत्तरादाखल कारवाई व गोळीबार केला, असेही हा प्रवक्ता म्हणाला.
पाकिस्तानी सैनिकांनी त्यांना लक्ष्य करायच्या क्षेत्राची व्याप्ती वाढवीत जम्मू जिल्ह्यातील आर.एस. पुरा व अरनिया सेक्टरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेजवळील वसाहती आणि लष्करी चौक्यांवर १७ व १८ आॅगस्टदरम्यान गोळीबार केला होता. यात एक जण जखमी झाला होता. स्वातंत्र्यदिनीही पाकिस्तानी सैनिकांनी काही भारतीय चौक्यांवर गोळीबार केला होता. (वृत्तसंस्था)