जैसलमेरच्या सीमेजवळ पाकिस्तानचा युद्ध सराव
By admin | Published: September 28, 2016 05:44 PM2016-09-28T17:44:50+5:302016-09-28T17:50:50+5:30
उरी दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने कठोर कारवाईचा इशारा दिल्यानंतर धाबे दणालेल्या पाकिस्तानने जोरदार युद्ध सराव सुरु केला आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
जैसलमेर, दि. २८ - उरी दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने कठोर कारवाईचा इशारा दिल्यानंतर धाबे दणाणलेल्या पाकिस्तानने जोरदार युद्ध सराव सुरू केला आहे. राजस्थानात जैसलमेरला लागून असलेल्या आंतरराष्ट्रीय सीमेपासून १५ ते २० किमी अंतरावर पाकिस्तानी लष्कर आणि वायूदलाने संयुक्त युद्ध सराव केला.
युद्धाच्या वेळी ज्या वेगाने घडामोडी घडतात तशा घडामोडी पाकिस्तानी सीमेजवळ सुरू होत्या. २२ सप्टेंबरला सुरू झालेला हा सराव ३० ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. पाकिस्तानी लष्कराने १५ हजार आणि हवाई दलाचे ३०० जवान या मोहिमेत सहभागी होणार आहेत.
या सरावामुळे भारतीय सीमेच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणारे सीमा सुरक्षा दल अधिक सतर्क झाले आहेत. या सरावात मोठ्या प्रमाणावर दारुगोळ्याचा वापर करण्यात येत असून, पाकिस्तानी लष्कराच्या अधिका-यांनी इथे येऊन या सरावाचा आढावा घेतला. युद्ध सरावात पाकिस्तान इथे नव्या उपकरणांचीही चाचणी घेत आहे.