पाकला ‘क्लीन चिट’ दिल्याने रणकंदन
By admin | Published: June 4, 2016 02:40 AM2016-06-04T02:40:35+5:302016-06-04T02:40:35+5:30
पठाणकोट हल्ल्यात पाकिस्तान सरकारचा हात असल्याचा कोणताही पुरावा नसल्याचे राष्ट्रीय तपास संस्थेचे (एनआयए) प्रमुख शरद कुमार यांनी म्हटल्यामुळे नवा वाद पेटला आहे.
नवी दिल्ली : पठाणकोट हल्ल्यात पाकिस्तान सरकारचा हात असल्याचा कोणताही पुरावा नसल्याचे राष्ट्रीय तपास संस्थेचे (एनआयए) प्रमुख शरद कुमार यांनी म्हटल्यामुळे नवा वाद पेटला आहे.
कुमार यांच्या दाव्यामुळे पाकिस्तानला आनंदाच्या उकळ््या फुटल्या आहेत. आमची भुमिका दहशतवादविरोधी असल्याचे आम्ही खूप आधीपासून सांगत आलो असून तेच खरे ठरल्याची मखलाशी त्याने केली. दरम्यान, पाकला क्लिनचिट दिल्यावरून राजकीय रणकंदन सुरू झाले असताना परराष्ट्र मंत्रालयाने पठाणकोट हल्ल्यात पाकच्या सहभागाचे पुरेसे पुरावे असल्याचे सांगत सरकारची बूज राखण्याचा प्रयत्न केला.
एनआयएप्रमुखांनी ‘न्यूज १८ डॉट कॉम’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले की, पाक सरकार किंवा त्यांच्या संघटनांनी पठाणकोट हल्ल्यासंदर्भात जैश-ए-मोहंमद किंवा मसूद अझहर याला मदत केली असल्याचा कोणताही पुरावा मिळाला नाही. कुमार यांच्या या मुलाखतीनंतर पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नफीस झकेरिया यांनी टिष्ट्वट केले की, पाकिस्तान दीर्घ काळापासून आपण दहशतवादाविरुद्ध असल्याचे सांगत आला आहे. एनआयए महासंचालकांच्या विधानातून पाकची भूमिका खरी असल्याचे सिद्ध झाले.