पेलेट्स गनऐवजी पावा शेल्स
By admin | Published: August 26, 2016 06:54 AM2016-08-26T06:54:32+5:302016-08-26T06:54:32+5:30
काश्मीर खोऱ्यातील अनेक आंदोलक मरण पावल्याने आणि हजारो जखमी झाल्यामुळे पेलेट्स गनला पर्याय म्हणून पावा शेल्स वापरण्यावर सहमती होताना दिसत आहे.
Next
नवी दिल्ली : पेलेट्स गनमुळे काश्मीर खोऱ्यातील अनेक आंदोलक मरण पावल्याने आणि हजारो जखमी झाल्यामुळे पेलेट्स गनला पर्याय म्हणून पावा शेल्स वापरण्यावर सहमती होताना दिसत आहे.
पेलेट गन्सना पर्याय शोधण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने नियुक्त केलेल्या तज्ज्ञ समितीचे पावा शेल्सवर एकमत झाल्याचे सांगण्यात येत आहे. पावा शेल्स म्हणजे काळी मिरीची पूड भरलेल्या गोळ्या असतात. आंदोलकांवर त्या झाडल्यास त्यांच्या डोळ्याची वा शरीराची आग होईल, पण त्यामुळे जीवितहानी होणार नाही वा आंदोलकांच्या शरीराला गंभीर जखमा होणार नाहीत, असे तज्ज्ञांना वाटत आहे.