कौतुकास्पद! IAS अधिकाऱ्याने निरोप समारंभात शिपायाला केला नमस्कार; सांगितलं हृदयस्पर्शी कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2023 12:05 PM2023-07-30T12:05:19+5:302023-07-30T12:18:13+5:30
दोड्डे यांच्या वागण्याचं लोक भरभरून कौतुक करत आहेत. हा फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
झारखंडमधील पलामूच्या डीसी पदावर असताना आयएएस आंजनेयुलु दोड्डे यांनी अनेक कामे केली. मात्र येथून बदली झाल्यानंतर त्यांनी आपल्या कार्यालयातील शिपायाच्या पायाला स्पर्श करून नमस्कार केला आणि नवा आदर्श घालून दिला आहे. तसे करण्यास त्यांनी मागेपुढे पाहिले नाही. झारखंड आणि पलामूसह संपूर्ण देशात हा चर्चेचा विषय बनला आहे. दोड्डे यांच्या या वागण्याचं लोक भरभरून कौतुक करत आहेत. हा फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
दोड्डे यांनी नवीन डीसी शशी रंजन यांच्याकडे पदभार सोपवला. दोड्डे यांचा निरोप समारंभ पार पडला. याच दरम्यान कार्यालयातील शिपाई नंद लाल प्रसाद गुप्ता यांनी त्यांच्या पायाला हात लावण्याचा प्रयत्न केला. पण आयएएस यांनी त्यांना थांबवून त्याच्या पायाला स्पर्श केला. नमस्कार करून आशीर्वादही घेतले. ते म्हणाले की, माझ्या वडिलांनीही शिपाई म्हणून काम केले आहे. डीसी म्हणून काम करताना तुमचा खूप पाठिंबा होता. वडिलांप्रमाणे तुम्ही माझी काळजी घेतलीस. डीसींनी कार्यालयातील तीनही शिपायांचा शाल पांघरून सत्कार केला.
नंद लाल प्रसाद गुप्ता यांच्याशी संवाद साधला. ज्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, कोणताही डीसी त्यांच्या पायांना हात लावेल, असा विचारही केला नव्हता. त्याने अचानक सर्वांसमोर माझ्या पायाला स्पर्श केला. क्षणभर मी थक्क झालो. स्वत:चे नुकसानही होत होते. दोड्डे जी यांनी पलामूमध्ये डीसी असताना खूप चांगले काम केले आहे. तो शांत स्वभावाचा माणूस आहे आणि पाय जमिनीवर आहेत. गोरगरीब, दिव्यांगांसाठी त्यांच्या मनात खूप आदर आहे.
ऑफिसमधून आल्यावरही भेटायला येणाऱ्या दिव्यांगांना ते भेटायचे. माझ्या 14 वर्षांच्या कर्तव्यात मी IAS कधीच पाहिला नव्हता. शशी रंजन यांना पलामूचे नवे डीसी बनवण्यात आले आहे. त्यांनी प्रक्रिया पूर्ण करून पदभार स्वीकारला आहे. शशी रंजन यांची यापूर्वी खुंटी डीसी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्याचबरोबर IAS दोड्डे यांना दुमका डीसी बनवण्यात आले आहे. दोड्डे म्हणाले की, पलामूमध्ये काम करण्याचा अनुभव खूप चांगला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.