तामिळनाडूत BJP-AIADMK युती होणार? अमित शांहाच्या भेटीनंतर पलानीस्वामींचे सूचक विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 22:38 IST2025-03-26T22:37:52+5:302025-03-26T22:38:08+5:30
Palaniswami On Alliance: AIDMK चे सरचिटणीस पलानीस्वामी यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची भेट घेतली.

तामिळनाडूत BJP-AIADMK युती होणार? अमित शांहाच्या भेटीनंतर पलानीस्वामींचे सूचक विधान
Palaniswami On BJP-AIADMK Alliance: पुढील वर्षी तामिळनाडूमध्ये विधानसभा निवणुका होणार आहेत. यासाठी भाजपने आतापासूनच तयारीला सुरुवात केली आहे. राज्यातील सत्ताधारी द्रविड मुन्नेत्र कळघम (DMK) चा सामना करण्यासाठी भाजप युतीचा पर्यायदेखील तपासत आहेत. याच पार्श्वभूमीवर तामिळनाडूचा मुख्य विरोधी पक्ष ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम (AIADMK)चे सरचिटणीस इडाप्पाडी के पलानीस्वामी यांनी बुधवारी (26 मार्च) सूचक विधान केले.
पलानीस्वामी यांनी मंगळवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांच्याशी झालेल्या भेटीनंतर युतीबाबतच्या चर्चांवर भाष्य केले. दिल्लीत पत्रकारांशी बोलताना पलानीस्वामी म्हणाले की, त्यांच्या पक्षाने तामिळनाडूमधील अनेक समस्यांबाबत केंद्रीय मंत्र्यांना माहिती दिली. राज्याचा निधी मिळण्यात विलंब होत असल्याने निधी लवकर देण्याची विनंती केली आहे. पण, यावेळी त्यांनी स्पष्टपणे युतीवर बोलणे टाळले. 'हो' किंवा 'नाही' असे उत्तर देण्याची गरज काय? युतीबाबतचा निर्णय निवडणुकीच्या वेळीच घेतला जाईल, अशी सूचक प्रतिक्रिया त्यांनी दिली.
द्विभाषिक धोरणावर काय म्हणाले...
पतानीस्वामी पुढे म्हणतात की, त्यांनी केंद्र सरकारकडे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना आणि शिक्षणाशी संबंधित योजना (SSA) अंतर्गत तामिळनाडूसाठी प्रलंबित निधी जारी करण्याची मागणी केली. तामिळनाडू सातत्याने द्विभाषिक धोरण अवलंबत आहे आणि ते पुढेही चालू ठेवले पाहिजे. संसदीय मतदारसंघांचे प्रस्तावित सीमांकन तामिळनाडूवर विपरीत परिणाम होणार नाही, अशा प्रकारे केले पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.