भारतात पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ निदर्शने, लोक रस्त्यावर उतरले; PM मोदींकडे केली 'ही' मागणी...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2023 10:03 PM2023-10-13T22:03:15+5:302023-10-13T22:05:11+5:30

Palestine Support in India: बंगळुरू, लखनौ, कोलकातासह अनेक शहरांमध्ये पॅलेस्टाईनच्या पाठिंब्यासाठी लोक रस्त्यावर उतरले.

Palestine Support in India: agitation in India in support of Palestine, people took to the streets against Israel | भारतात पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ निदर्शने, लोक रस्त्यावर उतरले; PM मोदींकडे केली 'ही' मागणी...

भारतात पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ निदर्शने, लोक रस्त्यावर उतरले; PM मोदींकडे केली 'ही' मागणी...

Palestine Support in India: इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाचे पडसाद इतर देशातही उमटत आहेत. इस्रायलचा दावा आहे की, 80 देश त्यांच्या समर्थनात उभे आहेत तर अनेक देश पॅलेस्टाईनला पाठिंबा देत आहेत. विशेष म्हणजे, भारतातील अनेक शहरांमध्ये पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ आणि इस्रायलच्या विरोधात शुक्रवारी निदर्शने झाली.

कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये लोकांनी पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ आवाज उठवला. बंगळुरूच्या जामिया मशिदीचे इमाम मौलाना मकसूद इम्रान म्हणाले की, इस्रायली सैन्य पॅलेस्टाईनच्या मुस्लिमांवर अत्याचार करत आहे. ज्यू, मुस्लिमांना जबरदस्तीने त्यांच्या भागातून हाकलून लावत आहेत.  इस्रायली लष्कराने अल अक्सा मशिदीमध्ये नमाजपठण करण्यावर बंदी घातली आहे. पॅलेस्टाईनमध्ये शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी त्यांनी प्रार्थना केली. 

जमशेदपूरमध्येही पॅलेस्टाईनचे समर्थन
झारखंडच्या जमशेदपूरमध्येही मुस्लिम समुदाय पॅलेस्टाईनला पाठिंबा देत आहे. जमशेदपूरच्या आंबा आझाद नगरमध्ये शुक्रवारच्या नमाजानंतर मुस्लिम समाजाच्या वतीने पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ निदर्शने करत इस्रायलविरोधात नाराजी व्यक्त केली.

लखनौमध्ये पॅलेस्टिनींसाठी नमाज अदा 
उत्तर प्रदेशातील लखनऊमध्येही पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ निदर्शने करण्यात आली. लखनौच्या आसिफी मशिदीत शुक्रवारच्या नमाजानंतर 'डाऊन विथ इस्त्रायल' आणि 'डाऊन विथ अमेरिका' अशा घोषणा देण्यात आल्या. येथे पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ आणि इस्रायलच्या विरोधात प्रार्थना करण्यात आल्या. शिया धर्मगुरू मौलाना कल्बे नवाद यांनी पंतप्रधान मोदींना आवाहन केले की, ते एक शक्तिशाली पंतप्रधान आहेत आणि त्यांनी हे युद्ध थांबवण्यासाठी पुढे यावे. पॅलेस्टाईनच्या लोकांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी काम केले पाहिजे.

बिहारच्या किशनगंजमध्येही तरुणाई रस्त्यावर 
बिहारच्या किशनगंजमध्येही शुक्रवारच्या नमाजानंतर तरुण रस्त्यावर उतरले आणि पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. या आंदोलनात काही अल्पवयीन मुलांनीही सहभाग घेतला. किशनगंजच्या मुख्य बाजारपेठेत हे आंदोलन झाले, ज्यामध्ये पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली. कोलकात्यातही अल्पसंख्याक युवा मंचाचे सदस्य पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ निदर्शने करत आहेत. यावेळी आंदोलक पॅलेस्टाईनच्या स्वातंत्र्यासाठी बॅनर घेऊन निदर्शने करण्यात आली. भारताने या मुद्द्यावर नि:पक्षपाती भूमिका घ्यावी, असे संघटनेचे म्हणणे आहे. 

तिरुअनंतपुरम आणि बडगाममध्येही पॅलेस्टाईनसाठी निदर्शने
सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया (SDPI) च्या सदस्यांनी केरळमधील तिरुवनंतपुरममध्ये पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ निदर्शने केली. जम्मू-काश्मीरमधील बडगाममध्ये इस्रायलने पॅलेस्टाईनवर केलेल्या हल्ल्याचा शिया मुस्लिमांनी निषेध केला. यावेळी इस्रायलच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

Web Title: Palestine Support in India: agitation in India in support of Palestine, people took to the streets against Israel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.