पालघर साधू हत्याकांड प्रकरण : सुप्रीम कोर्टात सर्व याचिकांवर एकत्र सुनावणी होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2020 07:25 PM2020-07-27T19:25:51+5:302020-07-27T19:28:26+5:30

सुप्रीम कोर्टात तीन स्वतंत्र याचिका दाखल करण्यात आल्या असून सीबीआय आणि एसआयटीकडे या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Palghar sadhu murder case: All petitions will be heard together in the Supreme Court | पालघर साधू हत्याकांड प्रकरण : सुप्रीम कोर्टात सर्व याचिकांवर एकत्र सुनावणी होणार

पालघर साधू हत्याकांड प्रकरण : सुप्रीम कोर्टात सर्व याचिकांवर एकत्र सुनावणी होणार

Next
ठळक मुद्देकोर्टाने महाराष्ट्र सरकारद्वारे दाखल करण्यात आलेल्या चौकशी अहवाल रेकॉर्डमध्ये घेतला आहे. सुप्रीम कोर्टाने या प्रकरणातील सगळ्या याचिका सुनावणीसाठी एकत्र घेण्यासाठी रजिस्ट्रारला आदेश दिले आहेत.

नवी दिल्ली - महाराष्ट्रातील बहुचर्चित पालघर मॉब लिंचिंग प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या सर्व याचिकांवर सुप्रीम कोर्ट एकत्र सुनावणी घेणार आहे. या हत्याकांडात दोन साधूंसह चालक अशा तीन जणांना ठार मारले गेले होते. कोर्टाने महाराष्ट्र सरकारद्वारे दाखल करण्यात आलेल्या चौकशी अहवाल रेकॉर्डमध्ये घेतला आहे. सुप्रीम कोर्टाने या प्रकरणातील सगळ्या याचिका सुनावणीसाठी एकत्र घेण्यासाठी रजिस्ट्रारला आदेश दिले आहेत.

सुप्रीम कोर्टात तीन स्वतंत्र याचिका दाखल करण्यात आल्या असून सीबीआय आणि एसआयटीकडे या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारने सीलबंद लिफाफ्यात चौकशी अहवाल सुप्रीम कोर्टात सादर केला आहे. या प्रकरणात आतापर्यंत १०० हून जास्त जणांना अटक करण्यात आली होती आणि पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. १६-१७ एप्रिलच्या रात्री दोन साधू आपल्या ड्रायव्हरसह गावातून जात होते. तेव्हा लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला होता. हल्ल्यात ३ जणांचा मृत्यू झाला होता. संतप्त जमावाने त्यांना मारहाण केली, त्यादरम्यान पोलीस तिथे उपस्थित होते. पोलिसांचा निष्काळजीपणा समोर आल्यानंतर प्रशासनाने कारवाई करून संबंधित पोलिसांना निलंबित केले होते. आता या हत्याकांडाची सुनावणी सुप्रीम कोर्टात पार पडणार आहे.

 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, व्हॉट्स अ‍ॅप आणि सोशल मीडियाच्या मदतीने सुरु होती देहविक्री

 

खळबळजनक! ८ वर्षाच्या मुलावर २५ वर्षाच्या नराधमाने केले लैंगिक अत्याचार 

 

Coronavirus News : सांगलीतील इंदिरानगर येथील कंटेनमेंट झोन नागरिकांनी केला उध्वस्त

 

'वॉरियर' आजीबाईंची गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घेतली भेट अन् दिली एक लाखांची मदत

 

निर्दयी बापाने अडीज वर्षात पाच पोटच्या मुलांची केली हत्या, कारण ऐकून लोकांना बसला धक्का

 

बापरे! केरळ, कर्नाटकात ISIS चे दहशतवादी मोठ्या संख्येने, संयुक्त राष्ट्राच्या अहवालात धक्कादायक माहिती उघड  

 

धक्कादायक! नवजात बाळाला दूध पाजले नाही म्हणून पतीने केली पत्नीची हत्या

 

संतापजनक! रायगड हादरलं, अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन नराधमाने केली हत्या

 

माहेरहून दोन लाख रुपये घेऊन ये; तगादा लावल्याने विवाहितेची आत्महत्या

Web Title: Palghar sadhu murder case: All petitions will be heard together in the Supreme Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.