Pampore Encounter Update: पंपोरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई; LeT च्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2021 04:48 PM2021-10-16T16:48:13+5:302021-10-16T16:48:29+5:30
Pampore Encounter : जम्मू- काश्मीरचे आयजी विजय कुमार यांनी सांगितले, नागरिकांच्या हत्येनंतर सुरक्षा दलांनी 9 चकमकींमध्ये 13 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.
श्रीनगर : जम्मू -काश्मीरमध्ये दोन पोलीस कॉन्स्टेबलच्या हत्येमध्ये सामील असलेला LeT चा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी
(Terrorists) उमर मुश्ताक खांडे ( Umar Mustaq Khandey) आज सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत ठार झाला. पुलवामाच्या (Pulwama) पंपोरमध्ये (Pampore) दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी उमर मुश्ताक खांडे याच्यासह अन्य दोन दहशतवाद्यांना ठार केले आहे. (Pampore Encounter Update Big Action Of Security Forces In Pampore Lashkars Most Wanted Terrorist Umar Mustaq Khandey Killed)
जम्मू- काश्मीरचे आयजी विजय कुमार यांनी सांगितले, नागरिकांच्या हत्येनंतर सुरक्षा दलांनी 9 चकमकींमध्ये 13 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. तर गेल्या 24 तासांमध्ये सुरक्षा दलांनी श्रीनगर शहरात 3 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. जम्मू -काश्मीर पोलिसांच्या माहितीनुसार, चकमकीत आतापर्यंत दोन दहशतवादी ठार झाले आहेत. सुरक्षा दलांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. यासोबतच दहशतवाद्यांकडून आपत्तिजनक साहित्यही जप्त करण्यात आले आहे.
या परिसरात अद्याप दहशतवादी असल्याची शक्यता असून पोलिसांनी शोधमोहीम सुरू ठेवली आहे. पोलिसांनी सांगितले की, ठार झालेला दहशतवादी उमर मुश्ताक खांडे याने श्रीनगरमधील बाघाट येथे मोहम्मद युसूफ आणि सीटी सुहेल या दोन पोलिसांची हत्या केली होती. पंपोरमधील दग्रबल येथे चहा पित असताना मोहम्मद युसूफ आणि सीटी सुहेल यांची गोळ्या घालून हत्या करण्यात केली होती.
J&K | An encounter is underway between security forces and terrorists in Drangbal area of Pampore, Pulwama.
— ANI (@ANI) October 16, 2021
Top LeT commander Umar Mustaq Khandey is trapped. He was involved in the killings of police personnel & other terror crimes.
(Visuals deferred by unspecified time) pic.twitter.com/zGXFnXMdrC
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंपोरमध्ये दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर परिसरात शोधमोहीम सुरू करण्यात आली. सुरक्षा दल तेथे पोहोचताच दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला, त्यानंतर सुरक्षा दलानेही दहशतवाद्यांना जोरदार प्रत्त्युतर दिले. दरम्यान, खात्मा करण्यात आलेले अन्य दोन दहशतवादी इतर अनेक गुन्ह्यांमध्ये सहभागी होते.
दरम्यान, यापूर्वी काश्मीर झोनचे आयजी विजय कुमार यांनी ट्वीट करून माहिती दिली होती की, टॉप 10 दहशतवादी उमर मुश्ताक पंपोर चकमकीत अडकले आहेत. तसेच, ते म्हणाले होते की, मुश्ताकचा ऑगस्टमध्ये सलीम पर्रे, अब्बास शेख, फारुख नली, युसुफ कांत्रो, रियाज शेटेरगुंड, जुबैर वानी, साकीब मंजूर आणि अशरफ मोल्वी आणि वकील शाह यांच्यासह टॉप 10 दहशतवाद्यांच्या टारगेट लिस्टमध्ये सामील केले होते.