पान १ : कुटबणातील मासेमारी बोटीवर मालवणात प्राणघातक हल्ला
By Admin | Published: May 5, 2015 01:20 AM2015-05-05T01:20:50+5:302015-05-05T01:20:50+5:30
पेट्रोल बॉम्बचा वापर
प ट्रोल बॉम्बचा वापरखलाशी जखमी मालवण हद्दीत घुसल्याचे म्हणणे बोटींची मोठी हानी कुंकळ्ळी : दक्षिण गोव्यातील कुटबण जेटीवरून मच्छीमारी करणार्या तीन मच्छीमारी बोटी चुकून मालवण समुद्राच्या हद्दीत घुसल्याने तेथील स्थानिक मच्छीमारांनी वेलांकनी, इन्फंट जिजस व सी लाइफ या बोटींवरील खलाशांवर हल्ला केला. त्यांना जबर मारहाण केल्याची तक्रार कुटबण बोटमालक संघटनेने केली आहे. मालवणच्या मच्छीमारांनी या बोटींवर हल्ला करताना पेट्रोल बॉम्बचा वापर केल्याचे खलाशांनी आज सकाळी कुटबण येथे पत्रकारांना सांगितले. या हल्ल्यात तीनही बोटींवर काम करणारे कामगार जबर जखमी झाले. लाठ्या व शस्त्रे घेऊन क्रूवर हल्ला केल्याचा दावा तीनही बोटींवरील खलाशांनी केला आहे. हल्लेखोरांनी बोटींवरील गॅस सिलिंडरही चोरल्याचे खलाशांनी सांगितले. वेलांकनी या बोटीवर काम करणारे खलाशी मारुती तांडेल यांनी या संदर्भात माहिती दिली. रविवारी (दि.३) दुपारी अडीचच्या दरम्यान तीनही बोटी भरकटल्यामुळे चुकीने मालवण हद्दीत पोहचल्या. समुद्रात पूर्वी सीमा निर्धारित करणारे दोरखंड असायचे. ते नसल्यामुळे हद्द ओलांडल्याचे या खलाशांच्या लक्षात आले नसाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. बोटी माघारी वळताना संध्याकाळी ५च्या दरम्यान सुमारे साठ जणांचा जमाव लहान होड्या घेऊन समुद्रात आला व तीनही मच्छीमारी बोटींवर हल्ला केल्याचे या खलाशांनी सांगितले. या हल्ल्यात त्या जमावाने बोटींच्या केबिनची नासधूस केली व डिझेलची पिंपे फोडून टाकली तसेच बोटीवरील गॅस सिलिंडरही पळवून नेल्याचे खलाशांनी सांगितले. किनार्यावरून या जमावाने बोटींवर पेट्रोलच्या बाटल्यात आग लावून बोटी जाळून टाकण्याचाही प्रयत्न केला व जिवाच्या आकांताने पळून जाऊन या खलाशांनी गोव्याचा किनारा गाठला म्हणून त्यांचे प्राण वाचले. या घटनेची माहिती मिळताच मच्छीमारमंत्री आवेर्तान फुर्तादो, वेळ्ळी मतदारसंघाचे आमदार बेंजामिन सिल्वा, बाणावलीचे आमदार कायतू सिल्वा यांनी कुटबण जेटीवर धाव घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. मंजूनाथ नाईक, देवा गौडा, सुमन सिंग, अनुराग नाईक, वास्दू नाईक हे खलाशी या हल्ल्यात जबर जखमी झाले. (प्रतिनिधी)चौकटमासळी घ्या; पण मारू नका...हल्लेखोरांना खलाशांनी सांगितले की आपण चुकून हद्द ओलांडली. मारलेली मासळी घ्या; पण आपल्याला मारू नका, अशी विनवणी केली होती. तरीही या जमावाने त्यांचे म्हणणे न ऐकता त्यांना जबर मारहाण केल्याचे या खलाशांचे म्हणणे आहे. संबंध बिघडण्याची शक्यतामच्छीमारमंत्री आवेर्तान फुर्तादो यांनी या संदर्भात महाराष्ट्रातील मत्र्यांशी बोलून योग्य तोडगा काढण्याचे आश्वासन स्थानिक बोटमालकांना दिले आहे. चुकून हद्द ओलांडलेल्या मच्छीमारांना मारहाण झाल्यास दोन्ही राज्यांतील मच्छीमारांचे संबंध बिघडण्याची शक्यता आहे. या अमानुष मारहाणीचा आमदार बेंजामिन सिल्वा व आमदार कायतू सिल्वा यांनी निषेध केला आहे.ढँङ्म३ङ्म : 0405-टअफ-14,कॅप्शन: हल्ल्यात सापडलेल्या ट्रॉलरांची पाहणी करताना मंत्री आवेर्तान फुर्तादो, आमदार कायतू सिल्वा, आमदार बेंजामिन सिल्वा व बोटमालक संघटनेचे अध्यक्ष सिप्रियान कार्दोज. ( ़छाया - विजयकुमार कोप्रे)ढँङ्म३ङ्म : 0405-टअफ-15,कॅप्शन: हल्ल्यात जखमी झालेले कामगार. ( ़छाया - विजयकुमार कोप्रे)