पान १-हार्दिक पटेल एकता यात्रेपूर्वी स्थानबद्ध
By Admin | Published: September 20, 2015 12:53 AM2015-09-20T00:53:47+5:302015-09-20T00:53:47+5:30
सुरतमध्ये कारवाई: गुजरातेतील मोबाईल इंटरनेट सेवा बंद
स रतमध्ये कारवाई: गुजरातेतील मोबाईल इंटरनेट सेवा बंदअहमदाबाद: पटेल समाजाला ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळावा, यासाठी सुरु झालेले मोठे आंदोलन दडपण्याचा चंग गुजरातेतील भाजपा सरकारने बांधल्याचे शनिवारी पुरते स्पष्ट झाले. पटेल आरक्षण आंदोलनाचे युवा नेते हार्दिक पटेल यांना पोलिसांनी शनिवारी त्यांच्या ३५ समर्थकांसह स्थानबद्ध केले. त्यानंतर गुजरात सरकारने कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासोबत कुठलीही अफवा पसरू नये याची खबरदारी म्हणून राज्यभरातील मोबाईल इंटरनेट सेवा बंद केली. प्रशासनाच्या पूर्व परवानगीशिवाय एकता यात्रा काढण्याचा प्रयत्न केल्याचे कारण पटेल यांच्या स्थानबद्धतेसाठी देण्यात आले. सुरतचे पोलीस आयुक्त राकेश अस्थाना यांनी सांगितले की, हार्दिक पटेल यांना शहरातील वरछा क्षेत्रात मंगध चौकात ताब्यात घेण्यात आले. कायदा व्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने ही कारवाई करण्यात आली. कारण या मोर्चात सहभागी होण्यापूर्वी त्यांनी संबंधित अधिकार्यांची परवानगी घेतली नव्हती. २२ वर्षीय हार्दिक यांनी पोलीस कारवाईची निंदा केली आहे. दांडी-अहमदाबाद मोर्चाची परवानगी न मिळल्याने त्यांनी एकता रॅलीबाबत कालपर्यंत गोपनीयता बाळगली होती. अनिश्चित काळासाठी मोबाईल इंटरनेट बंदकायदा सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळण्यासोबतच कुठल्याही प्रकारच्या अफवा पसरू नयेत यासाठी संपूर्ण गुजरातमधील मोबाईल इंटरनेट सेवा अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती पोलीस महासंचालक पी.सी. ठाकूर यांनी दिली. सुरतमध्ये हार्दिक यांना ताब्यात घेताच पोलिसांनी २४ तास मोबाईल इंटरनेट सेवेवर निर्बंध घालण्याबाबत अधिसूचना काढली. (वृत्तसंस्था)------------- पटेलांचा ओबीसीत समावेश करण्यात यावा यासाठी हार्दिक पटेल यांनी आंदोलन छेडले आहे. गेल्या २५ ऑगस्टला हार्दिक यांना अटक केल्यानंतर गुजरातमध्ये हिंसाचार भडकला होता. यात १० जणांचा मृत्यू तर कोट्यवधीच्या संपत्तीचे नुकसान झाले होते. ------------------ कोटआमचा आवाज चिरडण्याचा गुजरात सरकारचा डाव आहे. त्यांना आमच्यावर अत्याचार करायचे आहेत. राज्यात हिंसाचार माजावा अशी पोलीस आणि सरकारची इच्छा आहे. ही कारवाई लोकशाही भावनेच्या विरोधात आहे.हार्दिक पटेल पटेल आरक्षण नेता