पान १ पाकिस्तान

By admin | Published: September 1, 2014 09:34 PM2014-09-01T21:34:02+5:302014-09-01T21:34:02+5:30

पिाकस्तानातील पेच कायम

Pan 1 Pakistan | पान १ पाकिस्तान

पान १ पाकिस्तान

Next
रावणात रिमझिम पडणारा पाऊस आणि वसुंधरेने ल्यालेल्या हिरव्यागार शालूमुळे निसर्गसौंदर्य अगदी बहरून गेले असते. श्रावण आणि भाद्रपद हे दोन महिने सणावारांची रेलचेल घेऊन येतात. गणेशोत्सवासोबतच गौरी गणपतीचीदेखील चाहूल लागते. अडीच दिवसांसाठी माहेरी येणार्‍या गौरी अर्थात महालक्ष्मीच्या स्वागतासाठी सर्व आतुरतेने वाट पाहत असतात. राज्यातील इतर भागांसह पश्चिम विदर्भातदेखील मोठ्या उत्साहाने हा सण साजरा केला जातो. गौराईच्या आगमनाची तयारी दोन महिने अगोदरपासूनच सुरू होते. घराघरात स्वच्छतेवर विशेष लक्ष केंद्रित केले जाते. रंगरंगोटी आणि सजावटीच्या वस्तूंनी घर सुशोभित केले जाते. गणरायाच्या आगमनानंतर चवथ्या दिवशी म्हणजे भाद्रपद शुद्ध अष्टमीला अनुराधा नक्षत्रावर महालक्ष्मीची स्थापना केली जाते. गौराईच्या आगमनाप्रीत्यर्थ एकत्र जमलेले कुटुंबातील सर्व सदस्य मिळून ज्येष्ठा, कनिष्ठा व लहान बाळाची मुहूर्तावर प्रतिष्ठापना करतात. पार्वतीपुत्र अर्थात गणपतीबाप्पालादेखील याप्रसंगी मानाचे स्थान दिले जाते.
पश्चिम विदर्भात अनेक ठिकाणी वंशपरंपरेनुसार चांदीचे किंवा पितळेचे मुखवटे लावले जातात. तर अनेक ठिकाणी प्लास्टर ऑफ पॅरिस किंवा शाडू मातीच्या मुखवट्यांना प्राधान्य देऊन महालक्षुम्यांची प्राणप्रतिष्ठा केली जाते. सजावटीसाठी आकर्षक मखर व मंडप उभारला जातो. दुसर्‍या दिवशी विधिवत लक्ष्मी पूजन केलेजाते. या उत्सवाला धार्मिकतेची किनार असली तरी, अडीच दिवसांसाठी आपल्या माहेरी येणार्‍या लाडक्या मुलींच्या स्वागताची गोड संकल्पना या उत्सवात सामावलेली आहे. यानिमित्ताने का होईना, लेकी-बाळींना दोन दिवसांसाठी आपल्या माहेरी जाण्याची संधी मिळत असल्याने त्यांच्या चेहर्‍यांवर एक विलक्षण आनंद ओसंडून वाहत असतो. दुसर्‍या दिवशी भाद्रपद शुद्ध नवमीला गौरी-गणपतीच्या पूजनानंतर आप्तेष्ट व नातेवाइकांना महाप्रसाद वितरित केल्या जातो. महाप्रसादात ज्वारीची अंबिल, सोळा प्रकारच्या भाज्यांची एकत्र शिजवून केलेली भाजी, कतली, फळे, लाडू, करंज्या, पापड्या, फुलोरा अशा नानाविध पक्वान्नांचा समावेश महाप्रसादात असतो.
तिसर्‍या दिवशी भाद्रपद शुद्ध दशमीला गौरी विसर्जित केल्या जातात. सासरी जाण्याच्या कल्पनेने व्याकूळ झालेल्या भाविकांनादेखील महालक्षुम्यांच्या चेहर्‍यावर विरहाचे चित्र स्पष्ट जाणवते. नोकरी-उद्योगधंद्यांमुळे आजकाल कुणालाच एकमेकांसाठी वेळ काढण्यास सवड मिळत नाही. धावपळीच्या या जगात कामकाजानिमित्त चारी दिशांना विखुरलेल्या कुटुंबातील सदस्यांना एकत्र आणणार्‍या या साणाचा निश्चितच मनोभावे आणि दिलखुलासपणे प्रत्येकाने आनंद घ्यायलाच हवा.
- ज्ञा. रा. दहापुते
-----
फोटो : महालक्ष्मीचा प्रातिनिधिक फोटो वापरावा....
-----

Web Title: Pan 1 Pakistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.