पान 2 : फोर्स
By admin | Published: July 31, 2015 11:55 PM2015-07-31T23:55:08+5:302015-07-31T23:55:08+5:30
भारतीय सुरक्षा मंचतर्फे निषेध
Next
भ रतीय सुरक्षा मंचतर्फे निषेधपणजी : ‘डायोसेझन सोसायटी’ व ‘आर्चडायोसेझन बोर्ड ऑफ एज्युकेशन’च्या शाळांतून अधिकृत नोटिसा काढून व पालकांना वेठीस धरून ‘फोर्स’च्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी म्हणून ऐन सकाळी गडबडीच्या वेळी ठिकठिकाणी पालकांना रस्त्यावर उतरवून रहदारीचे मुख्य रस्ते बंद करून गोवाभर जनजीवन विस्कळित करून कायदा व सुव्यवस्थेलाच आव्हान देण्याच्या ‘फोर्स’च्या आणि ‘त्या’ शाळांच्या व्यवस्थापनांच्या आज प्रकट झालेल्या निदंनीय हडेलहप्पीचा भारतीय भाषा सुरक्षा मंच तीव्र निषेध करते. या प्रकाराची पूर्ण चौकशी सरकारने करावी आणि त्यास जबाबदार असणार्या शाळांविरुद्ध कडक कारवाई करावी आणि पवित्र शिक्षण क्षेत्रात घुसू पाहणारी ही दुष्प्रवृत्ती वेळीच ठेचून काढावी, अशी भा.भा.सु.म.ची यासंदर्भात मागणी आहे.आपल्याला हवे तेव्हा हवी ती मागणी गोवा सरकारने याच अधिवेशनात पूर्ण करावी, असे दरडावून आणि त्यासाठी आपण कोणत्याही थराला जाऊ शकतो, हे आज केलेल्या कायदा-सुव्यवस्था भंग करणार्या सुनियोजित कारस्थानाने दाखवून ‘फोर्स’ने धार्मिक पाठिंब्यावर ते सिद्ध केले आहे, ही शिक्षण क्षेत्राच्या बाबतीत चिंताजनक गोष्ट आहे. दमदाटीने सरकारवर दडपण आणण्याचा हा निंदनीय प्रयत्न आहे. असल्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवणार्या लोकांच्या अशा दडपणांना सरकारने अजिबात भीक घालू नये आणि कोणत्याही असंविधानिक दडपणाला बळी न पडता घटनेच्या चौकटीत बसणारेच निर्णय सर्मथपणे घ्यावेत, असे आवाहन भा.भा.सु.म.तर्फे करण्यात येत आहे, असे सुभाष वेलिंगकर, कृती-विभाग निमंत्रक, भा.भा.सु.म. यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.