पान 2- कुजबूज
By Admin | Published: July 31, 2015 12:52 AM2015-07-31T00:52:04+5:302015-07-31T00:52:04+5:30
‘आग्वाद’ची ‘हवा’
‘ ग्वाद’ची ‘हवा’आग्वाद कारागृहावर अनेकांचा डोळा आहे. अर्थात तेथील कैद्यांना कोलवाळच्या नव्या कारागृहात हलविल्यानंतर आता ‘आग्वाद’ प्रत्येकाला हवाहवासा वाटू लागला आहे. कला अकादमीचे अध्यक्ष आमदार विष्णू वाघ यांच्या डोक्यात सुपीक कल्पना आली आहे. लाल किल्ल्याच्या धर्तीवर आग्वादला ‘लाइट, साउंड शो’ सुरू करावा आणि पर्यटकांना तेथे अधिकाधिक आकर्षित केले जावे. कला अकादमीचे ते एक उपकेंद्रच व्हावे, अशी वाघ यांची भावना आहे. यामुळे निदान ‘आग्वाद’चे पावित्र्य आणि गांभीर्य तरी टिकून राहील, असे त्यांचे म्हणणे आहे. पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर यांनी कॅसिनो आग्वादला नेण्याचे भाष्य करून नव्या विषयाला तोंड फोडले आहे. ‘आग्वाद’ची ‘हवा’ आता अनेकांना हवीहवीशी वाटू लागली आहे.