पान 2- कुजबूज

By admin | Published: August 7, 2015 12:06 AM2015-08-07T00:06:58+5:302015-08-07T00:06:58+5:30

डाव साधला!

Pan 2 - Whistle | पान 2- कुजबूज

पान 2- कुजबूज

Next
व साधला!
सहकारी संस्थांवर चेअरमन, उपाध्यक्ष किंवा सचिव 10 वर्षांपेक्षा अधिक काळ राहू नये यासाठी कायदा आणला; परंतु या कायद्यात दुरुस्ती करण्याचे सुतोवाच सहकार मंत्री महादेव नाईक यांनी केल्याने तो चर्चेचा विषय ठरला आहे. असे बोलले जाते, की म्हापसा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या अध्यक्षपदावरून रमाकांत खलप, तसेच व्हीपीके क्रेडिट सोसायटीवरून सूर्या गावडे दूर व्हावेत यासाठी ही खेळी खेळण्यात आली. दोन्ही संस्थांच्या निवडणुका झाल्या आणि सरकारला हवे तसेच झाले. पदांवरून खलपही हेवे आणि गावडेही! सरकारने डाव साधला हेच खरे!
भाजपातील चौकडी
पणजीत सध्या विषय गाजत आहे तो महापालिकेतील 17 नगरसेवकांनी घेतलेल्या भूमिकेचा. चुकीचे पार्किंग आढळल्यास चारचाकींना टाळे लावून दंड वसूल केला जातो.हा दंड नवे भूर्दंड आहे असे या नगरसेवकांचे म्हणणे आहे. ज्याला दंड वसुलीचे कंत्राट दिले आहे तो भरमसाठ दंड आकारतो आणि फसवणूक करतो, असा आरोप आहे हे खरे असेलही; परंतु आतील बातमी अशी आहे की, या 17 नगरसेवकांपैकी बाबुशच्या खास र्मजीतील चार नगरसेवकांनी म्हणे गट निर्माण केला असून पार्किंग कारवाईचे कंत्राट ही चौकडी आपल्या ताब्यात घेऊ पहात आहे. आयुक्तांना याची कुणकुण लागली आहे. लवकरच याचा भांडाफोड झाल्या नवल वाटू नये.

Web Title: Pan 2 - Whistle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.