Budget 2020 : आता आधार कार्ड असेल तर लगेच मिळणार पॅन कार्ड, अर्थमंत्र्यांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2020 03:36 PM2020-02-01T15:36:02+5:302020-02-01T15:46:30+5:30
निर्मला सीतारामन यांनी आधार कार्ड असेल तर त्याच्या आधारे तुम्हाला लगेचच पॅन कार्ड मिळू शकेल अशी घोषणा केली आहे.
नवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत देशाचा अर्थसंकल्प सादर केला आहे. अर्थसंकल्पात शेती, उद्योग आणि शिक्षणामध्ये भरीव तरतूद करण्याची घोषणा करण्यात आली आहे. तसेच करदात्यांना दिलासा देण्यात आला आहे. आधार कार्ड आणि पॅन कार्ड संदर्भात अर्थमंत्र्यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे. आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे प्रत्येक कामासाठी उपयोगी पडतं. तसेच सरकारी योजनांसाठी ते लिंक करणं गरजेचं झालं आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आधार कार्ड असेल तर त्याच्या आधारे तुम्हाला लगेचच पॅन कार्ड मिळू शकेल अशी घोषणा केली आहे. सरकारने पॅन कार्ड मिळण्याची प्रक्रिया ही अधिक सोपी केली आहे. इन्स्टंट अलॉटमेंट सिस्टम ही सरकारच्यावतीने लाँच करण्यात आली आहे. यामुळे आधार कार्ड असेल तर लगेचच पॅन कार्ड मिळणार आहे. आतापर्यंत पॅन कार्ड काढण्यासाठी मोठी प्रकिया होती. मात्र आता सरकारने ते काम सोपं केलं आहे.
Finance Minister Nirmala Sitharaman: Govt to further ease process of allotment of PAN. Govt to launch system for instant allotment of PAN on basis of Aadhaar pic.twitter.com/WbDsLvTueU
— ANI (@ANI) February 1, 2020
प्राप्तिकर विभागाने पॅन-आधार लिंक करण्याची मुदत मार्च 2020 पर्यंत वाढवली आहे. त्यामुळे करदात्यांनी पॅन कार्ड अजूनही आधार कार्डशी लिंक केले नसेल तर त्यांच्यासाठी दिलासादायक बातमी आहे. 31 डिसेंबरपर्यंत पॅन कार्डआधार कार्डशी लिंक करणे सक्तीचे आहे, याची आठवण प्राप्तिकर विभागाने गेल्या पंधरा दिवसांपूर्वी एका जाहीर निवेदनाद्वारे करदात्यांना करून दिली होती. मात्र, आता प्राप्तिकर विभागाने पॅन-आधार लिंक करण्याची मुदत केंद्र सरकारने मार्च 2020 पर्यंत वाढवली आहे.
मध्यमवर्गाला मोठा दिलासा; १० लाखांपर्यंत आयकरात मोठी सूटhttps://t.co/IAJkV2HiI9#Budget2020#IncomeTax
— Lokmat (@MiLOKMAT) February 1, 2020
आधार कार्डाशी पॅन कार्ड असे करा लिंक
- सर्वप्रथम https://www.incometaxindiaefiling.gov.in या इन्कम टॅक्सच्या ई-पोर्टलवर लॉग इन करावे.
- होम पेजच्या डाव्या बाजूला असलेल्या लिंक आधार या पर्यायावर क्लिक करा.
- पर्यायावर क्लिक केल्यावर तेथे पॅन कार्डचा नंबर तसेच आधार नंबर, आधार कार्डावर असलेले नाव टाकावे.
- आधार कार्डावर केवळ जन्माचे वर्ष असल्यास त्या पर्यायाला टीक करावी.
- सर्व माहिती भरल्यानंतर तेथे असलेला कॅप्चा टाकून सबमिट करावे.
- लिंक झाल्यावर एक मेसेज मिळेल. जर आपले पॅन आणि आधार कार्ड आधीच लिंक झालेले असेल, तर तसा मेसेज आपल्याला दिसेल. एसएमएसद्वारेही हे लिंक करता येते.
Budget 2020 : वीज मीटर प्रीपेड होणार, सप्लायर आणि दर निवडण्याचा पर्याय असणारhttps://t.co/7QUc7k5i8s#Budget2020#BudgetSession2020
— Lokmat (@MiLOKMAT) February 1, 2020
महत्त्वाच्या बातम्या
Budget 2020 : सरकार एलआयसीमधील आपली भागीदारी विकणार, अर्थसंकल्पामधून मोठी घोषणा
Budget 2020 Income Tax : इन्कम टॅक्सचे स्लॅब बदलले अन् कररचनाही; अर्थमंत्र्यांची महत्त्वपूर्ण घोषणा
Budget 2020 : वीज मीटर प्रीपेड होणार, कंपनी आणि दर निवडण्याचा पर्याय असणार
Budget 2020: मोदी सरकार मुलींच्या लग्नाचं वय बदलणार? निर्मला सीतारामन यांनी दिले संकेत
Budget 2020 : मोदी सरकारचे 'उड्डाण'; देशभरात 100 विमानतळ कार्यरत करणार
Budget 2020: शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी मोदी सरकारच्या १६ मोठ्या घोषणा