Sputnik-V In India: आता 'स्पुतनिक-व्ही' लसीची भारतात निर्मिती होणार, DCGI नं दिली मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2021 08:47 AM2021-07-05T08:47:25+5:302021-07-05T08:48:18+5:30

ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियानं (DCGI) बायोटेक्नोलॉजी कंपनी पॅनेशिया बायोटेकला रशियाच्या 'स्पुतनिक-व्ही' लसीची भारतात निर्मिती करण्यास मंजुरी दिली आहे.

Panacea Biotec to make Sputnik V in India DCGI approves | Sputnik-V In India: आता 'स्पुतनिक-व्ही' लसीची भारतात निर्मिती होणार, DCGI नं दिली मंजुरी

Sputnik-V In India: आता 'स्पुतनिक-व्ही' लसीची भारतात निर्मिती होणार, DCGI नं दिली मंजुरी

Next

ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियानं (DCGI) बायोटेक्नोलॉजी कंपनी पॅनेशिया बायोटेकला रशियाच्या 'स्पुतनिक-व्ही' लसीची भारतात निर्मिती करण्यास मंजुरी दिली आहे. 'स्पुतनिक-व्ही' लसीची भारतात निर्मिती करणारी पॅनेशिया ही पहिली कंपनी ठरणार आहे. रशियानं कोरोना लसीबाबत सहा कंपन्यांसोबत करार केले आहेत. त्यात पॅनेशिया बायोटेक कंपनीचा देखील समावेश आहे. (Panacea Biotec to make Sputnik V in India DCGI approves)

भारतात 'स्पुतनिक-व्ही' लसीची निर्मिती करण्यासाठीचा परवाना मिळवणं अतिशय आवश्यक आहे. यासाठीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून लवकरच या लसीची निर्मिती भारतात केली जाणार आहे. यामुळे स्पुतनिक-व्ही लसीचा मोठ्या प्रमाणावर साठा उपलब्ध होऊ शकणार आहे. भारताच्या लसीकरण मोहिमेला यातून वेग प्राप्त होऊ शकेल. 

रशियाची 'स्पुतनिक-व्ही' कोरोना विरोधी लस ९१.६ टक्के प्रभावी आहे. पॅनेशिया बायोटेकडून स्पुतनिक-व्ही लसीची पहिली खेप रशियाच्या गामालेया केंद्राकडे पाठवण्यात आली होती. तिथं लसीची गुणवत्ता चाचणी करण्यात आली. यात कंपनीला हिरवा कंदील मिळाला असून सर्व चाचण्यांमध्ये यशस्वी सिद्ध झाली आहे. 

Read in English

Web Title: Panacea Biotec to make Sputnik V in India DCGI approves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.