पणजी पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर विजयी; तर वाळपईतून विश्वजीत राणे यांचा विजय

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2017 09:20 AM2017-08-28T09:20:54+5:302017-08-28T13:40:57+5:30

पणजी  मतदारसंघातील पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचा विजय झाला आहे.

Panaji constituency won by bye by Chief Minister Parrikar; BJP has increased two seats | पणजी पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर विजयी; तर वाळपईतून विश्वजीत राणे यांचा विजय

पणजी पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर विजयी; तर वाळपईतून विश्वजीत राणे यांचा विजय

Next
ठळक मुद्देपणजी  मतदारसंघातील पोटनिवडणुकीत  मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचा विजय झाला आहे.आरोग्यमंत्री विश्वजित राणे वाळपई मतदारसंघातून विजयी झाले आहे. मनोहर पर्रीकर यांनी 4 हजार 803 मतांनी निवडणूक जिंकली.

पणजी, दि. 28- विधानसभेच्या पोटनिवडणुकीत अपेक्षेप्रमाणे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आणि आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी मोठ्या मताधिक्याने विजय संपादन केला. पर्रीकर चार हजार ८०३ तर राणे १० हजार ०८७ मतांनी विजयी झाले. कॉंग्रेसचे पणजीचे उमेदवार गिरीश चोडणकर यांना ५ हजार ०५९ तर काँग्रेसचे वाळपईतील उमेदवार रॉय नाईक यांना केवळ ६ हजार १०१ मते मिळाली. गोवा मनोरंजन सोसायटीच्या इमारतीत सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरू झाली तेव्हा पहिल्या फेरीनंतरच पणजीचे पत्ते स्पष्ट झाले होते. पहिल्या फेरीची मतमोजणी संपली तेव्हा पर्रीकर ४ हजार २९० मते घेतली होती. ते २ हजार ०३३ मतांनी आघाडीवर होते. चोडणकर २ हजार २५२ मते घेऊन पिछाडीवर होते. पर्रीकरांची आघाडी नंतर प्रत्येक फेरीनंतर वाढत गेली. त्यांना एकूण ९ हजार ८६२ मते मिळाली.

वाळपई मतदारसंघाच्या मतमोजणीत पहिल्याच फेरीनंतर राणे यांनी ३ हजार ८१९ ची आघाडी घेतल्यानंतर काँग्रेसचा एक-एक कार्यकर्ता मतमोजणी केंद्रातून काढता पाय घेऊ लागला. त्यांना ज्या ऊसगाव पंचायत क्षेत्रातून फार मोठ्या अपेक्षा होत्या तेथेही पदरी निराशाच पडली. या पंचायतक्षेत्रातही राणे यांना मोठी आघाडी मिळाली. मतमोजणी संपली तेव्हा राणे यांच्या खात्यात तब्बल १६ हजार १८८ मते जमा झाली होती.

गोसुमं पुन्हा अपयशी
गोवा सुरक्षा मंच ( गोसुमं) या पक्षाला मागील निवडणुकीत जी २९९ मते मिळाली होती तेवढी मतेही यावेळी राखता आली नाहीत. पक्षाचे उमेदवार आनंद शिरोडकर यांना केवळ २२० मते मिळाली. नोटा पर्याय निवडणाºयांची संख्या आहे ३०१. केनेथ सिल्वेरा या अपक्ष उमेदवाराला ९६ मते मिळाली.

पणजीत मला अपेक्षेपेक्षा १३८ मते कमी 
निवडणूक निकालाने माझ्या आघाडी सरकारच्या स्थिरतेवर लोकांनी शिक्कामोर्तब केले. त्यांमुळे भाजप आघाडी सरकारचे मनोधैर्य वाढले आहे. पणजीत मला अपेक्षेपेक्षा १३८ मते कमी मिळाली, असं गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी म्हंटलं.


फेब्रुवारी २०१७ मध्ये झालेल्या गोवा विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीवेळी भाजपचा पराभव झाला होता. भाजपला केवळ तेरा जागा मिळाल्या होत्या, तर काँग्रेसला सतरा जागा मिळाल्या होत्या. मात्र नंतर काँग्रेसचे आमदार विश्वजित राणे यांनी राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केल्याने काँग्रेसचे संख्याबळ सोळा झाले. शिवाय भाजपचे आमदार सिद्धार्थ कुंकळ्ळ्येकर यांनी राजीनामा दिल्याने भाजपचे संख्याबळ बारा झाले होते. आता भाजपचे संख्याबळ चौदा झाले. गोवा फॉरवर्ड पक्षाचे तीन, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे तीन आणि तीन अपक्ष आमदार असे नऊ बिगरभाजप आमदार घेऊन पर्रीकर यांनी गेल्या मार्चमध्ये आघाडी सरकार स्थापन केले. या सरकारच्या स्थिरतेबाबत काही महिने प्रश्नार्थक चर्चा सुरू होती. पर्रीकर यांचा पराभव झाला असता तर सरकार कोसळले असते. पर्रीकर यांच्या विजयामुळे आता गोवा सरकारच्या स्थिरतेबाबतची साशंकता संपुष्टात आली.

Web Title: Panaji constituency won by bye by Chief Minister Parrikar; BJP has increased two seats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.