पान 2 - पॅरा शिक्षकांचे 5 रोजी पणजीत लाक्षणिक उपोषण
By Admin | Published: August 31, 2015 09:43 PM2015-08-31T21:43:53+5:302015-08-31T21:43:53+5:30
पॅरा शिक्षकांचे 5 रोजी पणजीत लाक्षणिक उपोषण
प रा शिक्षकांचे 5 रोजी पणजीत लाक्षणिक उपोषणपणजी : या महिन्यात नवीन शिक्षकांची भरती करण्यात येत आहे. मात्र, सर्व शिक्षा अभियानांतर्गत एक वर्षाच्या कंत्राटी तत्त्वावर 2006 सालापासून सेवेत घेण्यात आलेल्या पॅरा शिक्षकांना नवीन पूर्ण दर्जाच्या शिक्षकांना देण्यात येणार्या सुविधा देण्यास सरकार तयार नाही. सरकारने मागण्या मान्य कराव्यात यासाठी येत्या शिक्षकदिनी 5 रोजी शिक्षकांकडून पणजी येथील आझाद मैदानावर सकाळी 10 ते सायंकाळी 5 पर्यंत एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येईल. येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत गोवा शिवसेना प्रमुख अजितसिंग राणे यांनी माहिती दिली. शिक्षण संचालनालयाने 2006 साली मेरीटच्या आधारे 149 शिक्षकांना सर्व शिक्षा अभियानांतर्गत एक वर्षाच्या कंत्राटी तत्त्वावर नोकरीत रुजू करून घेतले होते. मार्च महिन्यात शिक्षणाचे कंत्राट संपल्यावर पुन्हा त्यांना ब्रेक देऊन दोन महिन्यांनी कामावर घेतले जाते. अशा पद्धतीने गेली नऊ वर्षे राज्यातील विविध विद्यालयांत हे शिक्षक कंत्राटी तत्त्वावर नोकरी करीत आहेत. या शिक्षकांत शंभरपेक्षा जास्त महिला शिक्षकांचा समावेश आहे. कंत्राटी तत्त्वावर घेण्यात आलेल्या या शिक्षिका दूर अंतरावर असलेल्या गावातील शाळेत विद्यार्थ्यांना शिक्षण देतात. बर्याचशा गावात वाहतुकीची सोय नाही, रस्त्यांचीशी सोय नाही अशा गावात केवळ 3 हजार ते 9 हजार वेतन घेऊन शिक्षिका सेवा देत आहेत. या शिक्षकांच्या नऊ वर्षाच्या नोकरीचा विचार करता त्यांना नवीन शिक्षकांप्रमाणेच इंग्रजी माध्यमातून डी.एड करण्याची मुभा देण्यात यावी, अशी मागणी शिक्षकांनी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांची भेट घेऊन केली होती. मात्र, सरकारतर्फे यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही, असे राणे म्हणाले.या महिन्यात शिक्षण खात्यातर्फे आणखी 200 पेक्षा जास्त शिक्षकांची भरती करण्यात येणार आहे. या उमेदवारांनी इंग्रजी माध्यमातून बी.एड केले नाही. मात्र, त्यांना बी.एड शिक्षणक्रम पूर्ण करण्यासाठी कालावधी देण्यात येईल, असे सरकारने जाहीर केले आहे. आम्ही प्रशिक्षित नसल्याचे कारण देत आम्हाला नवीन जागांवर भरती करून घेण्यास सरकार हरकत घेत आहे. सर्व शिक्षा अभियानांतर्गत शिकविणार्या सर्व शिक्षकांनी विविध विषयांत बी.एड केले आहे. आम्हाला सरकारतर्फे अशा पद्धतीने कालावधी देण्यात यावा आम्हीही इंग्रजी भाषेत डी.एड अभ्यासक्रम पूर्ण करू, अशी मागणी शिक्षकांनी केली. सरकारने आपल्या मागण्यांवर लक्ष द्यावे म्हणून 5 सप्टेंबर या शिक्षक दिनादिवशीच एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येत असल्याचे उपस्थित शिक्षकांनी सांगितले.