पनामा पेपर लीक प्रकरण अमिताभ यांना भोवलं, 'अतुल्य भारत'मधून हटवलं

By admin | Published: April 18, 2016 09:51 PM2016-04-18T21:51:29+5:302016-04-18T21:51:29+5:30

पनामा पेपर लीक प्रकरण बिग बी म्हणजे अमिताभ बच्चन यांना चांगलंच भोवलं आहे.

The Panama Paper Leak case has been removed from Amitabh, from 'Incredible India' | पनामा पेपर लीक प्रकरण अमिताभ यांना भोवलं, 'अतुल्य भारत'मधून हटवलं

पनामा पेपर लीक प्रकरण अमिताभ यांना भोवलं, 'अतुल्य भारत'मधून हटवलं

Next

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, १८- पनामा पेपर लीक प्रकरण बिग बी म्हणजे अमिताभ बच्चन यांना चांगलंच भोवलं आहे. अमिताभ बच्चन यांना अतुल्य भारतचा  ब्रँड अँबेसेडर बनवण्याचा निर्णय केंद्रीय सांस्कृतिक मंत्र्यांनी रद्द केला आहे. एएनआयनं दिलेल्या वृत्तानुसार,  जोपर्यंत अमिताभ यांना क्लीन चिट मिळत नाही, तोपर्यंत त्यांना अँबेसेडर पदावर राहता येणार नसल्याचं केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयानं सांगितलं आहे.
पनामा पेपर लीक झाल्यानं जगभरात खळबळ उडाली होती. भारतातून अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय-बच्चन यांची नावं समोर आली होती. मोदी सरकारनं पनामा पेपर लिकमध्ये बच्चन यांचं नाव आल्यानं आता सावध पवित्रा घेतला आहे. आता फक्त प्रियंका चोप्रा अतुल्य भारतची ब्रँड अँबेसेडर असणार आहे.
पनामा पेपर लिकमध्ये मोठ्या प्रमाणात भारतीयांची नावं असल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे. केंद्रीय मंत्रालयानं याप्रकरणी समिती नेमली आहे. अमिताभ बच्चन निर्दोष आढळल्यास त्यांच्या नावाचा पुनर्विचार केला जाईल, असंही केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयानं म्हटलं आहे.

Web Title: The Panama Paper Leak case has been removed from Amitabh, from 'Incredible India'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.