बंगळुरूतील ३१ कुटुंबांचे ‘पनामा पेपर्स कनेक्शन’

By admin | Published: April 15, 2016 04:03 AM2016-04-15T04:03:03+5:302016-04-15T04:03:03+5:30

बंगळुरूच्या ३१ कुटुंबांनी करासाठी सुरक्षित अशा ब्रिटिश व्हर्जिन आयलँडमधील (बीव्हीआय) विविध कंपन्यांमध्ये गुंतवणूक केल्याचे अलीकडेच ‘पनामा पेपर्स’ प्रकरणातून उघड

'Panama Papers Connection' to 31 families in Bangalore | बंगळुरूतील ३१ कुटुंबांचे ‘पनामा पेपर्स कनेक्शन’

बंगळुरूतील ३१ कुटुंबांचे ‘पनामा पेपर्स कनेक्शन’

Next

बंगळुरू : बंगळुरूच्या ३१ कुटुंबांनी करासाठी सुरक्षित अशा ब्रिटिश व्हर्जिन आयलँडमधील (बीव्हीआय) विविध कंपन्यांमध्ये गुंतवणूक केल्याचे अलीकडेच ‘पनामा पेपर्स’ प्रकरणातून उघड झाले आहे.
आंतरराष्ट्रीय शोध पत्रकारांच्या कन्सोर्टियमने (आयसीआयजे) जागतिक डाटाबेसमध्ये विविध कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची नावे उघड केली आहेत.
या ३१ कुटुंबांनी केलेली गुंतवणूक वैध आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झाले नाही. एकाही राजकारण्याचा या यादीत समावेश नसणे ही आश्चर्याची बाब मानली जात आहे. बहुतांश लोक हे मोठ्या उद्योगसमूहातील आहेत. बंद पडलेल्या किंगफिशर एअरलाईन्सचे मालक विजय मल्ल्या यांचेच नाव प्रारंभी समोर आले होते.
मल्ल्या यांची कंपनी असलेल्या युनायटेड ब्रिव्हरीजचे (युबी) माजी व्यवस्थापकीय संचालक अटिकुक्के हरीश भट आणि युनायटेड स्पिरीट लिमिटेडचे माजी मुख्य वित्त अधिकारी पठाई अनाथा सुब्रमण्यम मुरली यांच्यासह तीन अधिकाऱ्यांची नावे पनामाने उघड केली आहेत. (वृत्तसंस्था)

कर्नाटकमधील खाण घोटाळ्याशी संबंध ?
युबीच्या तीन माजी अधिकाऱ्यांसह बेंगळुरूवासीया ३१ कुटुंबांनी विदेशात गुंतवणूक केली त्यावेळी कच्च्या लोखंडाची मागणी वाढली होती. तसेच कर्नाटकमधील खाण घोटाळ्याचा धूर बाहेर पडू लागला होता. विशेष म्हणजे या यादीत नाव असलेला एक जण हा खाण घोटाळ्यातील व्हीसलब्लोअर (जागल्या कार्यकर्ता) असल्याचा दावा करण्यात आला आहे. रिअल इस्टेट, तंत्रज्ञान सुविधा, बँकिंगमधील काही व्यावसायिकांचाही त्यात समावेश आहे.

Web Title: 'Panama Papers Connection' to 31 families in Bangalore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.