Panama Papers Leak: ऐश्वर्या रॉयची ED च्या कार्यालयात तब्बल 5 तास चौकशी, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2021 09:37 PM2021-12-20T21:37:25+5:302021-12-20T21:38:11+5:30

ऐश्वर्या राय बच्चनला यापूर्वीही दोन वेळा बोलावण्यात आले होते. मात्र दोन्ही वेळा तिने नोटीस स्थगित करण्याची विनंती केली होती. पनामा पेपर्स लीकची चौकशी करणाऱ्या विशेष तपास पथकासमोर तिने ही विनंती केली होती.

Panama Papers Leak issue Aishwarya Rai's 5 hour interrogation in ED's office | Panama Papers Leak: ऐश्वर्या रॉयची ED च्या कार्यालयात तब्बल 5 तास चौकशी, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Panama Papers Leak: ऐश्वर्या रॉयची ED च्या कार्यालयात तब्बल 5 तास चौकशी, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

googlenewsNext

पनामा पेपर्स लीक (Panama Papers Leak) प्रकरणी ऐश्वर्या राय बच्चनला (Aishwarya Rai Bachchan) समन्स बजावण्यात आले होते. तिला अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) चौकशीसाठी बोलावले होते, यानंतर ऐश्वर्या चौकशीत सहभागी होण्यासाठी ईडीच्या दिल्ली कार्यालयात पोहोचली. येथे ऐश्वर्याची साडेपाच तास चौकशी करण्यात आली. याप्रकरणी ईडीने नुकतीच अभिषेक बच्चनलाही समन्स बजावले होते.

ऐश्वर्या राय बच्चनला यापूर्वीही दोन वेळा बोलावण्यात आले होते. मात्र दोन्ही वेळा तिने नोटीस स्थगित करण्याची विनंती केली होती. पनामा पेपर्स लीकची चौकशी करणाऱ्या विशेष तपास पथकासमोर तिने ही विनंती केली होती.

फेमाप्रकरणी ईडीने ऐश्वर्याला समन्स बजावले होते. हे समन्स 9 नोव्हेंबर रोजी 'प्रतिक्षा' म्हणजेच बच्चन कुटुंबीयांच्या निवासस्थानी पाठवण्यात आले होते. यावर १५ दिवसांत उत्तर मागितले होते. ऐश्वर्याने ईमेलद्वारे ईडीला उत्तरही दिले होते. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटीमध्ये ईडी, आयकर विभाग आणि इतर एजन्सींचाही समावेश आहे.

नेमकं काय आहे पनामा पेपर लीक प्रकरण?
पनामा पेपर्स लीक प्रकरणात एका कंपनीचे (Mossack Fonseca) लिगल दस्तऐवज लीक झाले होते. हा डेटा जर्मन वृत्तपत्र Suddeutsche Zeitung (SZ) ने 3 एप्रिल 2016 रोजी Panama Papers या नावाने प्रसिद्ध केला होता. यात भारतासह 200 देशांतील राजकारणी, उद्योगपती, सेलिब्रिटींची नावे होती आणि त्यांच्यावर मनी लाँड्रिंगचा आरोप होता. यात 1977 ते 2015 अखेरपर्यंतची माहिती देण्यात आली होती. या यादीत 300 भारतीयांची नावे होती. यात ऐश्वर्याशिवाय अमिताभ बच्चन, अजय देवगण तसेच पळपुट्या विजय माल्याच्या नावाचाही समावेश होता.
 

Web Title: Panama Papers Leak issue Aishwarya Rai's 5 hour interrogation in ED's office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.