पानसहासाठी
By admin | Published: August 19, 2015 10:27 PM2015-08-19T22:27:37+5:302015-08-19T22:27:37+5:30
तुळजाभवानीला चांदीचा मुखवटा
Next
त ळजाभवानीला चांदीचा मुखवटा देऊळगावराजे : आलेगाव (ता. दौंड) परिसरातील धुमाळवस्ती येथील तुळजाभवानी मातेला भाविकांकडून सव्वा लाख रुपये किमतीचा चांदीचा मुखवटा अर्पण केला आहे.आलेगावचे कुलदैवत म्हणून आई तुळजाभवानी या देवीच्या मूतीर्ची स्थापना लोकवर्गणीतून करण्यात आली. या देवीमातेला चांदीचा मुखवटा असावा आणि देवीच्या छबिना मिरवणुकीसाठी पालखी असावी, या इच्छेनुसार ग्रामस्थांनी चांदीचा मुखवटा बसवला आहे. दरवर्षी नवरात्रोत्सवाची परंपरा या देवीच्या मंदिरात साजरी केली जाते. मंदिराचे पुजारी राजेंद्र गुणावरे तसेच शिवाजी ढमढरे, प्रल्हाद इंगवले, बाळासाहेब इंगवले, मंगल भोसले हे देवीचे भक्त नवरात्रोत्सवात सहभागी होऊन देवीची आराधना करतात. देवीच्या चांदीच्या मुखवट्याची पालखी मिरवणूक काढून धुमाळवस्ती, आलेगाव, कदमवस्ती या ठिकाणी ग्रामप्रदक्षिणा घालण्यात आली. ग्रामस्थांच्या वतीने पालखी मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले. या वेळी गावातील ढोल लेझीम पथकाच्या गजराने अवघा परिसर दुमदुमला होता. (वार्ताहर)वीटभ्या, रोपवाटिका आतागौण खनिज विभागाच्या रडारवरसुषमा नेहरकर-शिंदे, पुणेतहसिलदारांना आदेश वर्षाला बुडतोय ८ कोटींचा महसूल.जिल्ात गौण खनिजाचा एक-एक रुपया वसूल करण्याचा चंग महसूल विभागाने बांधला असून, प्रथमच विटभ्या आणि रोपवाटीकांसाठी वापरल्या जाणा?र्या मातीवर रॉयल्टी वसूल करण्यात येणार आहे. यासाठी जिल्ातील अनधिकृत वीटभ्यांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश सर्व तहसिलदारांना देण्यात आले आहेत.राज्य शासनाने यंदा प्रथमच सर्व जिल्हाधिकार्यांना महसूल वसूलीच्या उद्दिष्टात दुप्पट वाढ केली आहे. पुणे जिल्ात गतवर्षी १७५ कोटी रुपये महसूल वसूल करण्याचे उद्दिष्ट दिले होते. यंदा यामध्ये वाढ करुन तब्बल २७४ कोटी रुपये वसूल करण्यास सांगितले आहे. जिल्ात सर्वाधिक महसूल हा गौण खनिज आणि करमणूक कर विभागाकडून गोळा होतो. यामुळेच जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी या दोन्ही विभागाकडे खास लक्ष दिले असून, एक-एक रुपया वसूल करण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे.गौण खनिज विभागात आतापयंर्त प्रामुख्याने वाळू लिलाव आणि दगड खाण उत्खनन यामधूनच महसूल गोळा केला जात होता. परंतु गौण खनिजाचे इतर अनेक स्रोत दुर्लक्षित होते. यामध्ये देखील सुमारे ५0 ते ६0 टक्क्यांपयंर्त गळती होती. या सर्व गोष्टींना आळा घालण्यासाठी व वाळू माफियांच्या मुसक्या आवळण्यासाठी विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत.................................चौकटआता वीटभ्यांसाठी वापरण्यात येणार्या मातीवरही रॉयल्टी वसूल करण्याचा निर्णय गौण खनिज विभागाने घेतला आहे. यात शासन आदेशानुसार कुंभार व वडार समाजाला सुमारे २00 ब्रास मातीपयंर्त रॉयल्टी माफ आहे. परंतु जिल्ात सध्या या समाजाशिवाय अनेक व्यक्ती व्यवसाय म्हणून वीटभी चालवतात, पण रॉयल्टी भरत नाहीत. याचप्रमाणे जिल्ात सुमारे २५0 ते ३00 रोपवाटिका असून, येथे मोठ?ा प्रमाणात माती वापरली जाते. याकरिता एक ब्रास मातीसाठी २,७00 रुपये रॉयल्टी भरावी लागते. परंतु वीटभी, रोपवाटिकांकडून रॉयल्टी घेण्याचे प्रमाण खूपच अत्यल्प आहे. जिल्ात वीटभी आणि रोपवाटीकांकडून वर्षांला सरासरी ७ ते ८ कोटी रुपये महसूल वसूल होईल, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे सर्व वीटभ्या, रोपवाटीका गौण खनिज विभागाच्या रडारवर आल्या आहेत.